Lok Sabha Session Updates : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएने (राष्ट्रीय लोकशाही आघाडीने) देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलं असून १८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सोमवारपासून (२४ जून) सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सर्व नवनिर्वाचित खासदारांना खासदारकीची शपथ देण्यात आली. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाणार आहे. कालचा दिवस विरोधी पक्षांच्या खासदारांनी गाजवला. अधिवेशनाच्या सुरुवातीला विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेबाहेर एकत्र जमून देशातील जनतेला संविधानाच्या रक्षणाचं आश्वासन देत घोषणा दिल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारकीची शपथ घेत असताना काँग्रेस खासदार राहुल गाधी यांनी मोदी यांना संविधानाची प्रत दाखवून संविधान रक्षणाची आठवण करून दिली. दरम्यान, आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात काय घडतंय याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

Live Updates

Parliament Session Updates, 24 June 2024 : संसदेच्या अधिवेशनातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर

17:22 (IST) 25 Jun 2024
राहुल गांधींनी घेतली खासदारकीची शपथ

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी संविधान हातात घेऊन लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

https://twitter.com/ANI/status/1805553240886722728

16:46 (IST) 25 Jun 2024
लोकसभा अध्यक्षांच्या उमेदवारीवरून इंडिया आघाडीत बिनसलं? तृणमूलच्या भूमिकेमुळे पहिल्याच अधिवेशनात राडा?

लोकसभा अध्यक्षपदासाठी इंडिया आघाडीने के. सुरेश (काँग्रेस) यांना उमेदवारी दिली आहे. द्रमुक, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि आघाडीतील इतर काही पक्षांनी सुरेश यांच्या उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी केली आहे. मात्र ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने यावर स्वाक्षरी केलेली नाही. इंडिया आघाडी सध्या तृणमूलच्या मंजुरीची वाट पाहत आहेत. सुरेश यांच्या उमेदवारीवर तृणमूलने आक्षेप घेतल्याचं बोललं जात आहे.

14:48 (IST) 25 Jun 2024
लोकसभा अध्यक्षांनी नागेश पाटील आष्टीकरांना शपथ घेताना थांबवलं, कारण काय?

हिंगोलीचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी खासदारकीची शपथ घेताना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यामुळे यावर लोकसभा अध्यक्षांनी आक्षेप घेत नागेश पाटील आष्टीकर यांना थांबवलं. त्यानंतर आष्टीकरांना पुन्हा शपथ घ्यावी लागली.

14:40 (IST) 25 Jun 2024
भारताच्या ७१ वर्षांमध्ये पहिल्यांदाच होणार अध्यक्षपदासाठी निवडणूक!

स्वतंत्र भारताचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहता यावेळी पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. आत्तापर्यंत सत्ताधारी पक्ष विरोधकांच्या सहमतीने लोकसभा अध्यक्षपदावरील व्यक्तीचं नाव निश्चित करत असे. सत्ताधाऱ्यांच्या या निर्णयाला विरोधकांचीही सहमती मिळत असे. यंदा मात्र विरोधकांनी केलेली उपाध्यक्षपदाची मागणी मान्य न झाल्यामुळे आता संसदेबाहेरील निवडणुकीनंतर संसदेच्या आतील निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे.

13:15 (IST) 25 Jun 2024
प्रणिती शिंदेंनी घेतली हिंदीतून शपथ

सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी हिंदी भाषेत खासदारकीची शपथ घेतली. यावेली त्यांच्या हातात संविधानाची प्रत होती. इंडिया आघाडीचे सर्व खासदार संविधाना चंरक्षण करतील असा संदेश त्यांनी या माध्यमातून दिला आहे.

12:15 (IST) 25 Jun 2024
भाजपा खासदाराने ईश्वराच्या नावाने शपथ घेतली नाही

भाजपाच्या एका खासदाराने घेतलेल्या शपथेची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. राज भूषण चौधरी असं या खासदाराचं नाव आहे. जलशक्ती राज्य मंत्री असलेल्या डॉ. राज भूषण चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत इतर खासदारांप्रमाणे ईश्वराचं स्मरण करून शपथ घेण्याऐवजी ‘सत्यनिष्ठा प्रतिज्ञा’ केली. राज भूषण यांची शपथ ऐकून भाजपाचे इतर खासदार आश्चर्यचकित झाले होते.

सविस्तर वाचा

12:01 (IST) 25 Jun 2024
Parliament Session 2024 Live : भर्तृहरी महताब लोकसभेचे हंगामी अध्यक्ष

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजपा खासदार भर्तृहरी महताब यांची घटनेच्या कलम ९५ (१) अन्वये लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. हंगामी अध्यक्षाची काही महत्त्वाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी निवड केली जाते.

11:53 (IST) 25 Jun 2024
"जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय", राष्ट्रवादीच्या खासदाराने घेतली मराठीतून शपथ

संसदेत खासदारांचे शपथविधी चालू असून आज महाराष्ट्रातील खासदार शपथ घेऊ लागले आहेत. दरम्यान, रायगडचे खासदार सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - अजित पवार गट) यांनी मराठीतून शपथ घेतली. तसेच शपथविधीनंतर जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय शिवराय अशी घोषणा दिली.

10:40 (IST) 25 Jun 2024
राज्यसभेच्या सभागृहनेतेपदी जे.पी. नड्डांची नियुक्ती

भाजपाच राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची राज्यसभेच्या सभागृहनेतेपदी (Leader Of The House नियुक्ती करण्यात आली आहे.

Story img Loader