Lok Sabha Session Updates : देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएने (राष्ट्रीय लोकशाही आघाडीने) तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलं आहे. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. दरम्यान, १८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून (२४ जून) सुरू होत आहे. आज लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाईल. तसेच सर्व खासदारांना शपथ दिली जाणार आहे. यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषणही होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
१८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनातील घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर
भाजपा खासदार बी. वाय. राघवेंद्र सभागृहात म्हणाले, इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसने देशात आणीबाणी लागू केली होती. आणीबाणी काळात त्यांनी संविधान बदललं होतं. हे लोक संविधान बदलू शकतात. आम्ही उद्या संपूर्ण देशात काळा दिवस साजरा करणार आहोत.
भाजपाच राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची राज्यसभेच्या सभागृहनेतेपदी (Leader Of The House नियुक्ती करण्यात आली आहे.
सभागृहाला पंतप्रधान मोदींनी संबोधित केल्यानंतर विरोधी पक्षाकडून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये खर्गे यांनी म्हटलं आहे की मोदीनी त्यांच्या भाषणात त्यांचे customary (नेहमीचे) गरजेपेक्षा अधिक वापरले. रस्सी जल गई, पर बल नहीं गया.
प्रधानमंत्री मोदी जी ने अपने customary शब्द आज ज़रुरत से ज़्यादा बोले। इसे कहते हैं, रस्सी जल गई, बल नहीं गया।
— Mallikarjun Kharge (@kharge) June 24, 2024
देश को आशा थी कि मोदी जी महत्वपूर्ण मुद्दों पर कुछ बोलेंगे।
?NEET व अन्य भर्ती परीक्षाओं में पेपर लीक के बारे में युवाओं के प्रति कुछ सहानुभूति दिखाएंगे, पर… pic.twitter.com/AoPRqoURG5
लोकसभेच्या सभागृहात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान शपथ घेण्यासाठी उभे राहिल्यानंतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी ‘NEET…NEET…’ अशी घोषणाबाजी सुरू केली.
जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तथा नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला सभागृहात म्हणाले, सर्व विजयी खासदारांचं मी अभिनंदन करतो. मला आशा आहे की ही संसद लोकशाही टिकवेल. या निवडणुकीत जो तिरस्कार आणि घृणा समाजात पसरवली गेली होती ती नष्ट होईल, अशी मी अपेक्षा करतो. देशातलं सरकार कुबड्यांर आहे, तर त्यांच्यासमोर एक मजबूत विरोधी पक्ष उभा आहे.
संसदेच्या सभागृहात खासदारांचा शपथविधी चालू असताना विरोधी पक्षांमधील खासदार संसदेबाहेर आंदोलन करताना दिसले. यावेळी राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे दोघे भारताच्या संविधानावर आक्रमण करत आहेत. आम्ही ते खपवून घेणार आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत संविधानाचं रक्षण करणार.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षमंत्री राजनाथ सिंह, रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान, मनोहरलाल खट्टर, एच. डी. कुमारस्वामी, पीषुय गोयल, जीतन राम मांझी, धरमेंद्र प्रधान यांनी १८ व्या संसदेचे सदस्य म्हणून शपथ घेतली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, वरिष्ठ नेते राहुल गांधींसह ‘इंडिया’च्या खासदारांनी संसदेबाहेर “आम्ही संविधानाचं रक्षण करणार” अशा घोषणा दिल्या.
१८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात, इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून संसदेबाहेर ‘संविधाना’साठी घोषणाबाजीhttps://t.co/2jrmCKvB4K #India #Politics #LoksabhaSession2024 #ParliamentSession2024 #IndiaAlliance #Constitution pic.twitter.com/51uPEFY8Ht
— LoksattaLive (@LoksattaLive) June 24, 2024
संसदीय लोकशाहीमध्ये अध्यक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. लोकसभेचा अध्यक्ष हा लोकसभेचे कामकाज चालविणारा नेता असतो. राज्यघटनेच्या कलम ९४ नुसार, “लोकसभा विसर्जित झाल्यानंतर त्याची पहिली बैठक होईपर्यंत अध्यक्ष आपल्या पदावरच राहतात.” नव्या लोकसभेमध्ये सभागृहाच्या अध्यक्षाची निवड साध्या बहुमताने केली जाते. त्याची ही निवड होईपर्यंत हंगामी अध्यक्षांकडून काही महत्त्वाची कामे पार पाडली जातात. ‘हंगामी’ अथवा ‘Pro-tem’ या शब्दाचा अर्थच ‘थोड्या कालावधीकरीता’ अथवा ‘तात्पुरता’ असा आहे. राज्यघटनेमध्ये या पदाचा उल्लेख केलेला नाही. ‘संसदीय कामकाज मंत्रालया’च्या कार्यांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेमध्ये हंगामी अध्यक्षाची नियुक्ती आणि शपथविधीबाबतच्या तरतुदी नोंद करण्यात आल्या आहेत.
हंगामी अध्यक्षचा अर्थ ‘काही काळासाठी’ किंवा ‘तात्पुरता’ असा होतो. १९९८ पासून बीजेडीच्या तिकिटावर सहा वेळा जिंकलेल्या महताब यांनी अलिकडच्या वर्षांत प्रादेशिक पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला. ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्ण महताब यांचे पुत्र भर्तृहरी महताब २०२४ मध्ये कत्तक लोकसभा मतदारसंघात विजयी झाले. यावेळी त्यांनी बीजेडीच्या संतरुप मिश्रा यांचा पराभव केला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजपा खासदार भर्तृहरी महताब यांची घटनेच्या कलम ९५ (१) अन्वये लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. हंगामी अध्यक्षाची काही महत्त्वाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी निवड केली जाते.
विरोधकांच्या इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसमोर मोठं आव्हान निर्माण केलं होतं. हीच एकी आता संसदेतही पाहायला मिळणार आहे. एकीचं बळ दाखवण्यासाठी इंडिया आघाडीचे सर्व खासदार संसदेत एकत्र प्रवेश करणार