संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीत एक दिवसाने वाढ करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. आता पावसाळी अधिवेशनाचे कामकाज येत्या शनिवारपर्यंत चालेल. निवृत्तीवेतन विधेयकासह अन्य विधेयके मंजूर करून घेण्यासाठी कामकाजात एक दिवसाने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पावसाळी अधिवेशन सुरुवातीला ३० ऑगस्ट रोजी संपणार होते. मात्र, वेगवेगळी विधेयके मंजूर करून घेण्यासाठी त्यामध्ये एक आठवड्याची वाढ करण्यात आली. त्यानुसार अधिवेशन सहा सप्टेंबरला संपणार होते. मात्र, निवृत्तीवेतनासह अन्य विधेयके मंजूर करून घेण्यासाठी कामकाजात आणखी एका दिवसाने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ यांनी गुरुवारीच अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यात येईल, असे सूचित केले होते.

Story img Loader