Parliament Special Session Updates, 21 September 2023: बुधवारी संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर सखोल चर्चा झाली. संध्याकाळी लोकसभेत घेतलेल्या मतदानात ४५४ विरुद्ध २ मतांनी महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं असून आता अवघ्या देशाचं लक्ष राज्यसभेकडे लागलं आहे. परंतु लोकसभेतील जवळपास सर्वपक्षीय खासदारांचा विधेयकाला असणारा पाठिंबा पाहाता राज्यसभेतही हे विधेयक मंजूर होईल, असं सांगितलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Parliament Special Session Updates: संसदेच्या विशेष अधिवेशनाचे सर्व अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर!

17:29 (IST) 21 Sep 2023
“महिला आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करा”, काँग्रेसच्या मागणीवर जेपी नड्डा म्हणाले, “२०२९ मध्ये…”

बहुचर्चित महिला आरक्षण विधेयक बुधवारी (२० सप्टेंबर) लोकसभेत मंजूर करण्यात आलं. आता राज्यसभेत या विधेयकावर चर्चा सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसने लोकसभेत केलेली मागणी राज्यसभेतही लावून धरली. महिला अरक्षणाची अंमलबजावणी त्वरित व्हावी आणि या आरक्षणात स्वतंत्र ओबीसी कोटा असावा ही मागणी काँग्रेसच्या राज्यसभेतील खासदारांनी मांडली. यावर भाजपा अध्यक्ष आणि खासदार जे. पी. नड्डा यांनी उत्तर दिलं. जे. पी. नड्डा म्हणाले, आपल्याला संवैधानिक मार्गाने पुढं जावं लागेल. आत्ता महिला आरक्षण विधेयक मंजूर करून लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी होईल. जे. पी. नड्डा म्हणाले, अनेकजण मागणी करत आहेत की, महिला अरक्षण आत्ताच लागू करा, याच्या अंमलबाजवणीला इतका वेळ का लागतोय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या लोकांना मी सांगू इच्छितो की आपल्या देशात संवैधानिक व्यवस्था आहे.

सविस्तर बातमी

16:19 (IST) 21 Sep 2023
Parliament Special Session: भाजपाचा हेतू चांगला नाही – काँग्रेस खासदार

महिला आरक्षण विधेयकामागे भाजपाचा हेतू चांगला नाही – काँग्रेस खासदार दीपेंदर सिंह हुडा

16:18 (IST) 21 Sep 2023
Parliament Special Session: कॅनडाच्या मुद्द्यावर काय कारवाई होणार?

पंतप्रधान म्हणाले, कॅनडाच्या आरोपांवर योग्य ती कार्यवाही केली जाईल – काँग्रेस खासदार रवनीत सिंग

16:17 (IST) 21 Sep 2023
“२०२९ च्या आधी महिला आरक्षणाची अंमलबजावणी अशक्य, कारण…”, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नुकतंच पारित झालं आहे. यानंतर आता राज्यसभेत या विधेयकावर चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत मोठं विधान केलं आहे. “२०२९ च्या आधी महिला आरक्षणाची अंमलबजावणी अशक्य आहे,” असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं.

सविस्तर बातमी…

15:06 (IST) 21 Sep 2023
Parliament Special Session: घटनेच्या प्रस्तावनेतून खरंच धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द हटवलेत?

घटनेच्या प्रस्तावनेतून खरंच धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द हटवलेत? ओमर अब्दुल्ला म्हणतात…

15:06 (IST) 21 Sep 2023
संसदेतील घडामोडींवर ओमर अब्दुल्लांचं मोठं विधान…

ओमर अब्दुल्लांचं जम्मू-काश्मीरमध्ये बोलताना महत्त्वपूर्ण विधान…

13:05 (IST) 21 Sep 2023
Parliament Special Session: लोकांना चांद्रयान बघायचं होतं, पण… – सौगता राय

चांद्रयान हे काही कुण्या एका व्यक्तीचं यश नाही. ५० वर्षं शेकडो वैज्ञानिकांनी केलेल्या कामाचं ते फळ आहे. चांद्रयान चंद्रावर जात असताना लोकांना सॉफ्ट लँडिंग बघायचं होतं. पण टीव्हीवर मोदी दिसत होते – प्रा. सौगता राय, तृणमूल काँग्रेसचे खासदार

12:06 (IST) 21 Sep 2023
Parliament Special Session: आम्ही करोना काळात काय पाहिलं? – संजय राऊत

विज्ञान आणि तंत्रज्ञानाशिवाय हा देश पुढे जाणार नाही. पण आम्ही कोरोनाकाळात काय पाहिलं? थाळ्या वाजवा.. टाळ्या वाजवा.. हे विज्ञान आणि तंत्रज्ञान नाही आहे. – संजय राऊत

12:04 (IST) 21 Sep 2023
Parliament Special Session: जयराम रमेश यांचं चांद्रयान मोहिमेवर राज्यसभेत भाषण…

जयराम रमेश यांचं चांद्रयान मोहिमेवर राज्यसभेत भाषण…

12:02 (IST) 21 Sep 2023
Parliament Special Session: चीनवरही चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे – राजनाथ सिंह

सरकारमध्ये पूर्ण हिंमत आहे. चीनवरही चर्चा करण्याची आमची तयारी आहे – राजनाथ सिंह

11:43 (IST) 21 Sep 2023
Parliament Special Session: संस्कृती व विज्ञान एकमेकांना पूरक – राजनाथ सिंह

जे असं म्हणतात की आपल्या संस्कृतीपासून दूर जाऊन आपल्याला विज्ञानाचा स्वीकार करावा लागेल, त्यांना हे समजावं लागेल की संस्कृती व विज्ञान एकमेकांच्या विरोधात नसून एकमेकांना पूरक आहेत – राजनाथ सिंह

11:24 (IST) 21 Sep 2023
काँग्रेस कामगार सेल जिल्हाध्यक्ष संकत यांच्या जुगार अड्ड्यावर छापा

मनोरंजनासाठी या व्हिडीओ गेमला परवानगी दिली असली तरी ‘क्वॉइन’च्या नावाखाली पैसे लावून सर्रासपणे जुगार खेळला जात आहे.

सविस्तर वाचा…

11:07 (IST) 21 Sep 2023
Women Reservation Bill: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले सभागृहाचे आभार

काल भारताच्या संसदीय यात्रेमधला एक सुवर्णक्षण होता. त्या क्षणाचे भागीदार या सभागृहातल्या सर्व पक्षांचे सर्व सदस्य आहेत. सर्व पक्षाच्या नेत्यांनाही त्या क्षणाचं श्रेय जातं. तुमच्या माध्यमातून या महत्त्वपूर्ण निर्णयात आणि देशाच्या मातृशक्तीमध्ये नवीन ऊर्जा भरण्यात कालचा निर्णय महत्त्वाचं योगदान देणार आहे. यातून मातृशक्तीमध्ये निर्माण होणारा विश्वास देशाला नव्या उंचीवर नेईल. या कामात तुम्ही सगळ्यांनी जे समर्थन दिलं, चर्चा केली त्यासाठी मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी</p>

10:26 (IST) 21 Sep 2023
Women Reservation Bill: भाजपाचा काँग्रेसला टोला

सोनिया गांधींच्या भूमिकेवरून भाजपाचा काँग्रेसला टोला

10:26 (IST) 21 Sep 2023
Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पारित झाल्यानंतर मोदींची प्रतिक्रिया…

महिला आरक्षण विधेयक पारित झाल्यानंतर मोदींची प्रतिक्रिया…

10:24 (IST) 21 Sep 2023
Parliament Special Session: जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट केला राहुल गांधींचा व्हिडीओ

जर भारतीय समाज जाती जातींनी बनला असेल तर त्या जातींची समाजाची जनगणना झालीच पाहिजे… कळायला हवं….कोण किती आहेत आणि त्यांना किती मिळतंय बहुजन राही उपाशी आणि हे भांडणे करून खातात तुपाशी दूध का दूध आणि पाणी का पाणी होवून जावूद्या

10:18 (IST) 21 Sep 2023
Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक तातडीने लागू करा – राहुल गांधी

महिला आरक्षण विधेयक तातडीने लागू करा – राहुल गांधी

10:16 (IST) 21 Sep 2023
Parliament Special Session: महिला आरक्षण विधेयक आता राज्यसभेत

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर झाल्यानंतर आता राज्यसभेत या विधेयकावर चर्चा होणार आहे.

महिला वर्गाला राजकीय व्यवस्थेतही सामावून घेण्याच्या उद्देशाने प्रयत्न झाले पाहिजेत, अशी मागणी होऊ लागली.(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

Parliament Special Session Updates: संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज चौथा दिवस