Parliament Special Session 2023: संसदेचं विशेष अधिवेशन १८ सप्टेंबरपासून बोलवण्यात आलं आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं मंत्रिमंडळ आणि सर्वपक्षीय खासदार यांच्यासह संसदेच्या नव्या इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर जे पहिलं विधेयक लोकसभेत मांडलं गेलं ते महिला आरक्षण विधेयक आहे. या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली असून आज आणि उद्या यावर साधकबाधक चर्चा होणार आहे. मोदींनी हे विधेयक मांडल्यापासूनच काँग्रेस आणि भाजपा यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. अशात आज काँग्रेसतर्फे सोनिया गांधींनी भूमिका मांडली आहे. या सगळ्या घडामोडींवर आणि देशात तसंच राज्यात काय काय घडणार हे आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Parliament Special Session| संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षणावर चर्चा, सोनिया गांधी बोलणार?
पुणे: मुंढवा येथील उड्डाणपुलाची कामे अंतिम टप्प्यात आली असून, डिसेंबर अखेरपर्यंत ती पूर्ण करून नव्या वर्षापासून उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेच्या ताफ्यात येत्या आठवड्यात दहा विद्युत बस दाखल होणार आहेत, अशी माहिती उपक्रमातील एका अधिकाऱ्याने दिली.
गडचिरोली : सलग दुसऱ्या वर्षी गडचिरोली जिल्ह्याने आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीच्या (एचएमआयएस) गुणांकनात १०० पैकी ९२ गुण घेऊन राज्यात अव्वलस्थान पटकावले. पायाभूत सुविधांचा अभाव, दुर्गम, अतिदुर्गम, डोंगरपाड्यांवर दळणवळणाची अपुरी साधने असताना खडतर प्रवास करत आरोग्यसेवा पुरविण्यात येथील यंत्रणेला यश आले.
वर्धा : सावंगी येथील मेघे विद्यापीठाच्या यावर्षीच्या गणेशोत्सवात विविध उपक्रम होत असून ‘जी-२०’ परिषदेप्रमाणे करण्यात आलेली रोषणाई हे मुख्य आकर्षण ठरले आहे. नेहमीप्रमाणे होणाऱ्या रोषणाईत यावेळी बदल करण्यात आला आहे.
चंद्रपूर : सोयाबीन पिकावर विविध कीड व रोग अचानकपणे आल्यामुळे तीनच दिवसांत संपूर्ण सोयाबीन पीक पिवळे पडून मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे.
नागपूर : ऑगस्ट महिन्यात मोठ्या ‘ब्रेक’नंतर सप्टेंबरमध्ये पाऊस आला तरी म्हणावा तसा पावसाला जोर नाही. मात्र, आता वायव्य बंगालच्या उपसागरात पश्चिम बंगाल आणि ओडिशाजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा ओडिशावरून दक्षिण झारखंडच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोसमी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
नागपूर : शेअर बाजारात पैसे गुंतवून नफा कमावण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची तब्बल साडेदहा लाखांनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी सौरभ बाबूलाल पटेल (३७) रा. लक्ष्मीनिवास, लकडगंज यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. अनिल देशमुख असे आरोपीचे नाव आहे.
नागपूर : राज्यातील बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांडाचा तपास सात वर्षांनंतरही निष्कर्षहीनच आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) आरोपींविरुद्ध गुन्हे सिद्ध होतील, अशी ठोस ‘लिंक’ अद्याप सापडली नाही. त्यामुळे सीबीआय यासंदर्भात सक्षम न्यायालयात अहवाल दाखल करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती ‘सीबीआय’ने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे.
नवी दिल्लीत संसदेचं विशेष अधिवेशन सुरू आहे. मंगळवारी ( १९ सप्टेंबर ) नव्या संसदेतील कामकाजाचा पहिला दिवस पार पडला. या दिवसाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. प्रफुल्ल पटेल यांनी ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर याचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महिला आरक्षण विधेयक पास झालं याचं आम्हाला आनंद आहे. मात्र याविषयी एक चिंताही आहे. मागच्या १३ वर्षांपासून भारतीय स्त्रिया आपल्या राजकीय आरक्षणाची वाट बघत आहेत. तसंच त्यांना आता आणखी काही दिवस वाट बघावी लागणार आहे? किती वर्षे वाट बघावी लागणार? २ वर्षे, ४ वर्षे, ८ वर्षे? काँग्रेस म्हणून आमची मागणी आहे की महिला आरक्षण विधेयक लवकरात लवकर लागू करावं. सरकारला जी पावलं उचलायची आहेत ती त्यांनी उचलावीत. राजकारणात स्त्रियांचं महत्वाचं योगदान आहे. आत्ताची वेळ ही सर्वात योग्य वेळ आहे. या बिलाला आणखी विलंब करु नका. तातडीने हे बिल मंजूर करा अशी मागणी सोनिया गांधींनी केली आहे.
हे सरकार जे महिला आरक्षण बिल आणतंय ते काँग्रेसने २०१० मध्ये आणलं होतं. लोकसभेत ते टिकलं नाही. आत्ताचं सरकार महिलांसाठी काही नवं करत नाही. २०१४ पासून यांचं सरकार आहे. यांना बिल आणायचं असतं तर आधीच आणलं असतं असं म्हणत मल्लिकार्जुन खरगेंनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
महिला आरक्षण बिल हमने 2010 में राज्यसभा में पास कराया था। अगर उस बिल को लाते तो वह जल्दी पास हो जाता।
— Congress (@INCIndia) September 20, 2023
सरकार का कहना है कि जनगणना और उसके बाद होने वाले निर्वाचन क्षेत्र के परिसीमन के बाद महिला आरक्षण बिल लागू होगा। इससे पता चलता है कि इसमें बहुत समय लगेगा।
: कांग्रेस अध्यक्ष… pic.twitter.com/cMwfCHChtg
महिला आरक्षण विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. त्याआधी काँग्रेस नेत्यांची एक बैठक पार पडली. संसदेत काय रणनीती ठरवायची यावर आज चर्चा झाल्याचं समजतं आहे.
कांग्रेस अध्यक्ष और राज्यसभा में नेता प्रतिपक्ष श्री @kharge के चेंबर में विपक्षी दलों की बैठक हुई।

इस बैठक में महिला आरक्षण बिल को लेकर विचार विमर्श किया गया। pic.twitter.com/BNbKpckgpm
नरेंद्र मोदी सरकार जे विधेयक आणतं आहे ते महिला आरक्षण बिल नाही ते महिलांना मूर्ख बनवा या आशयाचं विधेयक आहे. कारण या सरकारने आत्तापर्यंत जी आश्वासनं दिली ती हवेत विरुन गेली. या सरकारने बिल किती दिवसांमध्ये पास होणार आणि त्याचा कायदा कधी होणार ते सांगावं. ते यांना सांगता येणार नाही. कारण हे बिल आणणं हा या सरकारचा नवा जुमला आहे असं म्हणत आपचे खासदार संजय सिंग यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
#WATCH | AAP MP Sanjay Singh says, "This is definitely not a Women's Reservation Bill, this is 'Mahila Bewakoof Banao' Bill. We have been saying this because none of the promises made by them have been fulfilled ever since PM Modi came to power. This is another 'jumla' brought by… pic.twitter.com/eBd6OaOnV2
— ANI (@ANI) September 20, 2023
महिला आरक्षण देणं या सरकारच्या नशिबी नाही अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. काँग्रेसच हा प्रश्न सोडवणार आहे. १५ लाख खात्यात जमा करु हे सांगून यांनी मतं मिळवली. आता या सरकारने आणखी एक जुमला उभा केला आहे असंही विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
संसदेचं विशेष अधिवेशन १८ सप्टेंबरपासून बोलवण्यात आलं आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं मंत्रिमंडळ आणि सर्वपक्षीय खासदार यांच्यासह संसदेच्या नव्या इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर जे पहिलं विधेयक लोकसभेत मांडलं गेलं ते महिला आरक्षण विधेयक आहे.