Parliament Winter Session Latest News : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसने उद्योगपती गौतम अदणींवर अमेरिकेत लावण्यात आलेल्या कथित लाचखोरीच्या आरोपांवर चर्चा घेण्याची मागणी लावून धरली आहे. यामुळे संसदेचे कामकाज तिसऱ्या दिवशीही विस्कळीत राहिले. यादरम्यान आता तृणमूल काँग्रेस पक्षाने मात्र काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. संसदेत तिसरा सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या टीएमसीने मात्र लोकांशी निगडीत महत्वाचे मुद्दे मांडता यावेत तसेत त्यांच्यावर चर्चा व्हावी यासाठी सभागृहाचे कामकाज चालू राहावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

२०२१ साली काँग्रेस पक्षाने डाव्या पक्षांसोबत युती करत ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी विरोधात पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढवली होती. तेव्हापासून काँग्रेस आणि टीएमसी या दोन पक्षांमध्ये तणाव वाढला आहे. लोकसभा निवडणूकीत देखील काँग्रेस आणि डाव्या पक्षांची युती होती, ज्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीपासून अंतर राखले.

BJP Ghar Chalo , Ghar Chalo, BJP target members booth ,
पुणे : भाजपचे ५ जानेवारीला ‘घर चलो’, प्रत्येक बूथवर २०० सदस्यनोंदणीचे उद्दिष्ट
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
industry minister uday samant
हिंजवडी आयटी पार्कची कोंडी : उद्योगमंत्री उदय सामंत ‘ॲक्शन मोड’वर; अधिकाऱ्यांना दिले आदेश
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
Image Of Atul Save
Atul Save : कॅबिनेट मंत्री अतुल सावेंविरोधात शिवसेना मैदानात, पालकमंत्रीपदास केला विरोध
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!
Congress and BJP both hypocrite over Situation of Dalits in India
डॉ. आंबेडकरांच्या बाबतीत काँग्रेस व भाजपा दोघेही दुटप्पी; दलितांच्या प्रश्नांवर दोन्ही पक्ष उदासीन

संसदेत मात्र काँग्रेस आणि टीएमसी हे दोन पक्ष एकत्र काम करत आले आहेत. पण सध्या काँग्रेसकडून अदाणीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी होत आहे. तर दुसरीकडे टीएमसीने आपली वेगळी भूमिका असल्याचे संकेत दिले आहेत. सरकारला जबाबदार धरता यावे यासाठी संसदेचे कामकाज सुरळीत चालावे आणि प्रश्नोत्तराचा तास व्हावा अशी इच्छा टीएमसीने व्यक्त केली आहे

अमेरिकेत उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर झालेल्या कथित लाचखोरीच्या आरोपावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे नेते दोन्ही सभागृहात सर्व कामकाज स्थगित करण्याच्या नोटिसा देत आहेत. तर इतर विरोधी पक्षाचे खासदार मणिपूरमध्ये अस्थिर बनललेली परिस्थिती, संभल येथील हिंसाचार तसेच जुलैमध्ये वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे बाधित झालेल्या लोकांना विशेष मदत देण्यासंबंधीच्या मुद्द्यांवर चर्चेची मागणी करत आहेत.

दरम्यान टीएमसीच्या सूत्रांनी सांगितले की, संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चेसाठी पक्षाच्या वरिष्ठांनी पाच मुद्दे निश्चित केले आहेत. ज्यामध्ये महागाई , बेरोजगारी, पश्चिम बंगाल गृहनिर्माण आणि इतर निधीपासून वंचित राहणे, खतांचा तुटवडा आणि मणिपूरमधील हिंसाचार यांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे यामध्ये अदाणींवर झालेल्या आरोपांचा कुठेच उल्लेख नाही.

हेही वाचा >>फक्त २०० रुपयांसाठी देशाशी गद्दारी; पाकिस्तानी गुप्तहेरांना माहिती पुरविणाऱ्या गुजरातमधील आरोपीला अटक

टीएमसीच्या खासदार काय म्हणाल्या?

याबद्दल टीएमसी लोकसभा खासदार काकोली घोष दस्तीदार म्हणाल्या की, “आम्हाला संसदेचे कामकाज चालवायचे आहे. एकाच मुद्द्यावर संसदेच्या कामकाजात अडथळा यावा अशी आमची इच्छा नाही. आपण सरकारला त्यांच्या अपयशाकरिता जबाबदार धरले पाहिजे”. संसदेत आम्ही तीव्रपणे लोकांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रीत करू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्या पुढे म्हणाल्या की, “टीएमसी भाजपाचा सामना करेल, पण भाजपला कसे सामोरे जायचे याबद्दल आमचा दृष्टीकोन धोरणात्मकदृष्ट्या वेगळा असू शकतो”.

जानेवारी २०२३ मध्ये जेव्हा हिंडेनबर्ग रिसर्चचा अदाणी समूहाच्या कथित गैर व्यवहारांबद्दलचा अहवाल समोर आला होता, तेव्हा सर्व विरोधकांनी एकत्र येत या आरोपांबाबत संयुक्त संसदीय समिती (JPC) कडून सखोल चौकशीची मागणी केली होती. पण नंतर, टीएमसी आणि डाव्या पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली केलेल्या चौकशीला पाठिंबा दिला. त्यानंतर जेपीसीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांमध्ये फूट पडल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नंतर जेपीसीच्या मागणीपासून स्वत:ला वेगळे केले होते.

Story img Loader