संसदेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती आखण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या(भाजप) वरिष्ठ नेत्यांची आज रविवार बैठक होत आहे. भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक सुरू आहे.
याआधी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अधिवेशन सुरळीत सुरु ठेवण्याचे विरोधी पक्षांना आवाहन केले आहे. सरकारला या अधिवेशनात अनेक महत्वाची विधेयके संमत करुन घ्यायची आहेत. त्यात अन्नसुरक्षा विधेयकाला कायद्याचे स्वरुप देण्याचा सरकार प्रयत्न करणार आहे. भाजपने याला विरोध दर्शविलेला नाही तरी, विधेयकाच्या काही मुद्दांवर भाजप सहमत नाही. त्यामुळे हे मुद्दे उपस्थित करुन सरकारला कोंडीत पकडण्याचा भाजपचा मानस असणार आहे.