वृत्तसंस्था, नवी दिल्ली : निती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) निवृत्त सनदी अधिकारी परमेश्वरन अय्यर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने शुक्रवारी घेतला. अय्यर हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) १९८१ च्या तुकडीचे उत्तर प्रदेश केडरचे निवृत्त अधिकारी असून ते अमिताभ कांत यांची जागा घेतील. ते निती आयोगाचे तिसरे सीईओ असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारत सरकारची सार्वजनिक धोरणे ठरविण्याचे काम निती आयोग करतो. निती आयोगाचे विद्यमान सीईओ कांत यांचा कार्यकाळ ३० जून २०२२ रोजी संपुष्टात येत आहे. त्यानंतर या पदावर अय्यर हे काम करतील, असे सरकारच्या अधिसूचनेत म्हटले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अय्यर यांच्या नियुक्तीला दोन वर्षे किंवा पुढील आदेश मिळेपर्यंतच्या कालावधीपर्यंत (यापैकी जो आधी असेल त्याप्रमाणे) मंजुरी दिली आहे.

परमेश्वरन अय्यर यांचा जन्म श्रीनगर येथे झाला असून त्यांनी देहरादूनचे डून स्कूल आणि नंतर दिल्लीच्या स्टीफन महाविद्यालयात प्रारंभिक शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांना अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली होती.

जागतिक बँकेचा अनुभव

अय्यर यांनी सनदी सेवेतून २००९ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर ते जागतिक बँकेच्या पाणी आणि स्वच्छता प्रकल्पात रुजू झाले होते. २०१६ मध्ये केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशनच्या अंमलबजावणीसाठी त्यांची नियुक्ती केली होती. उघडय़ावर शौचास बसण्याची गरज भासू नये तसेच घनकचऱ्याचे व्यवस्थापन असे या योजनेचे स्वरूप होते. २०२० मध्ये ते पुन्हा जागतिक बँकेत परतले होते.