मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली चाललेले गोव्यातील भाजप शासन शनिवारी आपले वर्ष पूर्ण करीत आह़े  याच वेळी राज्यातील प्रमुख उद्योगांपैकी एक असलेल्या खाण उद्योगावर घोंगावणाऱ्या संकटामुळे गोवा सध्या मंदी अनुभवत आह़े
सत्ताधारी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत मोठय़ा फरकाने धूळ चारल्यानंतर भाजप शासनाचा शपथविधी मागील वर्षी ९ मार्च रोजी पार पडला होता़  त्यानंतरच्या वर्षभरात भाजप शासनाने ‘लाडली लक्ष्मी’सारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली़  या योजनेनुसार मुलीला तिच्या लग्नासाठी एक लाख रुपये मिळण्याची शाश्वती शासनाकडून दिली जात़े  तसेच पेट्रोलवरील कर रद्द करून पेट्रोलचे दर ११ रुपयांनी कमी करण्यातही शासन यशस्वी झाले आह़े  मात्र खाणकामाला गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात स्थागिती देण्यात आल्यामुळे पर्रिकर यांचे वेगाने विकास साधण्याचे मनसुबे पूर्णत्वास जाऊ शकलले नाहीत़

Story img Loader