आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांना भाजपचा चेहरा म्हणून पुढे करावे, अशी सूचना करून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मोदी यांच्या पारडय़ात आपले वजन टाकले आहे.
मोदी यांचे प्रशासकीय कौशल्य अत्यंत चांगले असून ते तसेच लोकप्रियही आहेत. त्यांना पुढे करून निवडणुकांचा प्रचार केला तर पक्षास निवडणुकीत चांगले भवितव्य राहील, असे मत पर्रिकर यांनी व्यक्त केले. आागमी लोकसभा निवडणुका मे महिन्यात होण्याची शक्यता असून किमान सहा महिने अगोदर तरी मोदी यांचे नाव प्रचारात आणणे आवश्यक आहे. मोदी यांच्याबद्दल लोकांचे मत काय आहे, याची आपल्याला चांगलीच कल्पना आहे. त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करा असे आपण म्हणत नाही परंतु पक्षाचा चेहरा म्हणून त्यांना पुढे आणावे. अर्थात पक्षश्रेष्ठी याबद्दल जो निर्णय घेतील, त्याचा आपण आदर करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader