संरक्षण मंत्री अ‍ॅशटन कार्टर यांच्या भारत भेटीअगोदर अमेरिकेने पाकिस्तानला शस्त्रास्त्र विक्री केल्याबाबत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी चिंता व्यक्त केली आहे.
आपण या प्रकरणाच्या विशिष्ट मुद्दय़ांवर प्रतिक्रिया देणार नाही पण पाकिस्तानला शस्त्रास्त्र विक्रीबाबत भारताला चिंता वाटते असे त्यांनी सांगितले.
अमेरिकेने पाकिस्तानला शस्त्रास्त्रे विकल्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, हे नक्कीच चिंताजनक आहे.
अमेरिकेने पाकिस्तानला ५.४ अब्ज रुपयांची एफ १६ विमाने विकली आहेत, असे अमेरिकी काँग्रेसच्या ताज्या अहवालात म्हटले आहे. एफ १६ विमाने अमेरिकेने पाकिस्तानला विकल्याने एकूण निम्मी मागणी पूर्ण करण्यात आली आहे. दहशतवाद्यांशी सामना करण्यात पाकिस्तानला मदत व्हावी या नावाखाली अमेरिकेने पाकिस्तानला गेल्या दहा वर्षांत भरीव लष्करी मदत केली आहे. पाकिस्तानला जी शस्त्रे अमेरिकेने दिली आहेत ती अतिरेक्यांविरोधात वापरण्याच्या उपयोगाची नसून पारंपरिक युद्धातील वापराची आहेत यावरून ती भारताविरोधात वापरली जाऊ शकतात असा अर्थ लावण्यात आला आहे.
माजी सैनिकांच्या एक श्रेणी- एक निवृत्ती वेतनाचा प्रश्न अडकलेला नसून त्यात वेगाने प्रगती चालू आहे फक्त थोडी सहनशक्ती दाखवावी लागेल असे त्यांनी सांगितले. काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्य़ात तंगधर येथे चार अतिरेक्यांना ठार केल्याच्या घटनेबाबत त्यांनी सांगितले की, घुसखोरी रोखण्यास लष्कर सतर्क आहे.

Story img Loader