प्रचारासाठी स्टार मंडळींना बोलावले, तर त्याचा खर्च राजकीय पक्षांच्या खात्यामध्ये गृहीत धरला जाईल. मात्र, जर स्टारसोबत पक्षाचा उमेदवार व्यासपीठावर बसला, तर तो खर्च संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात गणला जाईल, असा निकाल दिल्लीतील निवडणूक आयोगाने बुधवारी दिला. उमेदवाराच्या प्रचाराच्या फलकांवर जर स्टार मंडळींचे छायाचित्र वापरले, तरी तो खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात गणला जाईल, असेही आयोगाने स्पष्ट केले.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष कोणकोणत्या स्टार मंडळींना प्रचारासाठी बोलावणार आहेत. त्याची यादी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जर राजकीय पक्षाच्या उमेदवाराने स्टार मंडळींसोबत प्रचारफेरीत सहभाग घेतला, तर त्याचा ५० टक्के खर्चही संबंधित उमेदवाराचा निवडणूक खर्च म्हणून गणला जाईल, असे आयोगाने म्हटले आहे.