देशातील न्यू साऊथ वेल्स भागास तीव्र उष्मा, कोरडे हवामान आणि वादळी वाऱ्याने वेढले असून गेल्या ४० वर्षांतील सर्वाधिक तीव्रतेच्या वणव्याने काही राज्ये प्रभावित झाली आहेत. त्यामुळे या प्रांतातील लोकांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे.
या वणव्यामुळे आतापर्यंत, २०० घरे भस्मसात झाली असून, १२० घरांचे गंभीर नुकसान झाले आहे. सिडनीच्या पश्चिमेकडे असलेल्या ‘ब्ल्यू माऊंटन’ परिसरास वणव्याच्या ज्वाळांनी ग्रासले असून त्यामुळे संपूर्ण शहरात धूर आणि राखेचे साम्राज्य पसरले आहे.या वणव्यात आपल्या मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या एका व्यक्तीचा बळी गेला असून ही संख्या वाढण्याची भीती आहे.