एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या गटाने सुरू केलेला पक्ष कुणाचा हा वाद म्हणजे देशाच्या संसदीय रचनेची थट्टा आहे असा युक्तिवाद आज कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगासमोर केला. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगासमोर आपला उर्वरित युक्तिवाद मांडला. कपिल सिब्बल यांचं आजही हेच म्हणणं होतं की काही आमदार खासदार सोडून गेले म्हणून पक्ष फुटलेला नाही. या सगळ्यांनी पक्ष सोडला असला तरी पक्ष दुभंगलेला नाही. पक्ष जागेवरच आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.

धनुष्यबाण कुणाचा आणि शिवसेना पक्ष कुणाचा? या सुनावणीचा आजचा तिसरा दिवस निवडणूक आयोगासमोर होता. १० जानेवारी, १७ जानेवारी त्यानंतर २० जानेवारीला म्हणजेच आज निवडणूक आयोगासमोर ही सुनावणी सुरू होती. मागच्या वेळी ठाकरे गटाने पुढची तारीख मागून घेतली होती. शिंदे गटाने राष्ट्रीय कार्यकारिणी ही निवडणूक आयोगात जाण्यापूर्वी एक दिवस आधी घेतली त्याला काहीही अर्थ नाही असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. शिवसेनेची घटना मान्य नाही हे कोणत्या आधारांवर ठरवलं आहे? असा युक्तिवादही निवडणूक आयोगासमोर करण्यात आला. तसंच हा सगळा वाद म्हणजे देशाच्या लोकशाही रचनेची थट्टा आहे असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. ठाकरे गट म्हणजेच राजकीय पक्ष हा योग्य आहे असंही सांगण्यात आलं. आज कपिल सिब्बल यांनी सुमारे एक तास युक्तिवाद केला. शिंदे गटाची आत्तापर्यंत झालेली कार्यवाही ही शिंदे गटाकडे आहे का? कागदावर ही कार्यवाही आहे का? असं म्हणत शिंदे गटाच्या कार्यकारिणीलाही कपिल सिब्बल यांनी आव्हान दिलं आहे.

Sharad Pawar Slams Raj Thackeray
Sharad Pawar : “राज ठाकरे काहीही ठोकून देतात, मूर्खासारखं..” शरद पवारांची खोचक शब्दांत टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
raj thackeray criticized sharad pawar
“शरद पवारांचं आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं”, राज ठाकरेंची सडकून टीका; रिफायनरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनाही केलं लक्ष्य, म्हणाले…
uddhav Thackeray sawantwadi
“कोकण आणि शिवसेनेचे नाते तोडण्याचा प्रयत्न, कोकणचे अदानीकरण होऊ देणार नाही”, उद्धव ठाकरेंचा इशारा
raj thackeray criticized uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंच्या हातून पैसा सुटत नाही, बॅगेत काय असणार?” राज ठाकरेंची खोचक टीका!
wani vidhan sabha constituency BJP kunbi statement bag inspection
वणीत भाजपमागे शुक्लकाष्ठ, कुणबी वक्तव्यानंतरचे बॅग तपासणी प्रकरण अंगलट येण्याची शक्यता
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray says Obstruction of projects so people will not support him
“उद्धव ठाकरेंकडून प्रकल्पांची अडवणूक, जनता त्यांना थारा देणार नाही…” देवेंद्र फडणवीसांची टीका

कपिल सिब्बल यांनी हेदेखील म्हटलं आहे की जर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या लोकांनी बंड केलं होतं तर निवडणूक आयोगाकडे जाण्यासाठी एक महिना का लावला? राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्यासोबत आहे, शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीर आहे असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. ठाकरे गटाची कार्यकारिणी ही बरखास्त होऊ शकत नाही. ठाकरे कार्यकारिणी घटनेप्रमाणे आहे असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.

मागच्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेत फूट पडली आहे. त्यानंतर अंधेरीची जी पोटनिवडणूक झाली त्याआधी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवरच दावा सांगितला. त्यानंतर निवडणूक आयोगासमोर हा वाद गेला. या दोन गटांचा वाद सुरू झाल्याने निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आणि नावही गोठवलं. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळालं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिलं गेलं. तर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह मिळालं आणि बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं. आता निवडणूक आयोगासमोर या दोन्ही गटांची सुनावणी सुरू आहे. मात्र या दोघांमधला वाद म्हणजेच भारतीय लोकशाही रचनेची थट्टा आहे असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.