एपी, बँकॉक
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
लंडन-सिंगापूर विमानात उड्डाणात धक्के बसल्यामुळे (टर्ब्युलन्स) एका प्रवाशाचा मृत्यू तर अन्य एक जखमी झाल्याची घटना घडली आहे. हे विमान वादळामुळे तातडीने बँकॉकला वळवण्यात आले, या ठिकाणी जखमी प्रवाशांच्या मदतीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती, अशी माहिती ‘सिंगापूर एअरलाइन्स’तर्फे मंगळवारी देण्यात आली.‘बोईंग ७७७-३०० ईआर’ प्रकाराचे हे विमान २११ प्रवासी आणि १८ ‘क्रू मेंबर्स’सह दुपारी ३.४५च्या सुमारास बँकॉकमध्ये उतरल्याचे एअरलाइनने आपल्या ‘फेसबुक पोस्ट’मध्ये म्हटले आहे.
‘फ्लाइट रडार२४’ची माहिती आणि ‘असोसिएटेड प्रेस’च्या विश्लेषणानुसार सिंगापूर एअरलाइन्सचे हे विमान ३७ हजार फूट उंचीवर होते. वादळी हवामानात धक्के बसू लागल्याने ते तीन मिनिटांच्या कालावधीत ते ३१ हजार फूट खाली घसरले. हे विमान ३१ हजार फुटांवर फक्त १० मिनिटांपेक्षा कमी अंतरावर थांबले. त्यानंतर बँकॉकमध्ये केवळ अर्ध्या तासात वेगाने खाली उतरवण्यात आल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा >>>मोदींच्या भाषणांत विकासापेक्षाही काँग्रेस, ध्रुवीकरणाच्या मुद्द्यांवर जोर; पाच टप्प्यांत १११ भाषणे
बँकॉकमधील सुवर्णभूमी विमानतळापासून २० किलोमीटर दूर असलेल्या समितीवेज श्रीनाकरिन रुग्णालयाचे आपत्कालीन पथक ‘एसक्यू ३२१’ विमानातील जखमी प्रवाशांवर उपचारासाठी तैनात करण्यात आले होते. सुवर्णभूमी विमानतळाच्या ‘लाइन’ या संदेशवहन व्यासपीठावर चित्रफित प्रसिद्ध केली असून, त्यात विमानतळावर रुग्णवाहिकांची रांग लागली होती.
मदतीसाठी पथक बँकॉकला
‘सिंगापूर एअरलाइन्स मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांबद्दल मनापासून सहवेदना व्यक्त करते,’ असे एअरलाइनने म्हटले आहे. प्रवाशांना आवश्यक मदत देण्यासाठी आम्ही थायलंडच्या स्थानिक अधिकाऱ्यांसोबत संपर्कात आहोत. तसेच आवश्यक असलेली अतिरिक्त मदत पुरवण्यासाठी एक पथक बँकॉकला पाठवत आहोत, असेही एअरलाईनतर्फे सांगण्यात आले.