मुंबईत कामाच्या वेळात ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यात सकाळी ६ ते ११ या वेळात ट्रेनमध्ये अनेकदा पाय ठेवायला जागा नसते, इतक प्रचंड गर्दी असते. अशा गर्दीतून मुंबईकर रोज प्रवास करून आपले ऑफिस, शाळा, कॉलेज गाठतात. मुंबई लोकल प्रवास म्हणजे एकप्रकारे टास्कच आहे. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोकल ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवासी आपल्या जीवाशी खेळत असल्याचे समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये एका प्लॅटफॉर्मवर ट्रेन पोहोचते पण ट्रेनचा दरवाजा बंद असल्याने प्रवासी खूप आरडाओरडा करत ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. यावेळी ट्रेनच्या दरवाजाच्या छोट्याश्या गॅपमधून प्रवेश करण्यासाठी जीवाशी खेळत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये प्रवासी ट्रेनचा अर्धा दरवाजा उघडल्यानंतर त्यातून जबरदस्तीने शिरण्यासाठी खूप घाई करताना दिसत आहेत. प्रवाशांची ही घाई ट्रेनमध्ये जागा मिळवण्यासाठी सुरू होती. हा व्हिडीओ Reddit वर पोस्ट करण्यात आला होता, ज्यात मुंबई ट्रेनमधील ऑटोमॅटिक दरवाजे असे लिहिले आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्रेनच्या आत काही लोक दरवाजाजवळ उभे आहेत, तर बाहेरच्या साईडला प्रवाशांची खूप गर्दी पाहायला मिळतेय व गोंधळाचाही आवाज ऐकू येतोय. यावेळी ट्रेनचे दरवाजे उघडू लागताच अनेक प्रवासी आत जाण्यासाठी एकमेकांना धक्काबुक्की करू लागतात.

यावेळी ट्रेनच्या आत उभे असलेले प्रवासी बाहेर उभ्या असलेल्या प्रवाशांना ट्रेन थांबेल एवढी घाई करु नका असे हातवारे करून सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याचा काही उपयोग होत नाही. व्हिडीओ जसजसा पुढे जातो तसतसे त्यातील लोक एकमेकांना धक्का देत चढण्याचा प्रयत्न करतात.

यावेळी दरवाजा अर्धा उघडताच त्यातून मार्ग काढून प्रवासी आत शिरण्याचा प्रयत्न करतात. यानंतर दार पूर्णपणे उघडते आणि प्रवाशांची गर्दी ट्रेनमध्ये पटापट शिरते. ट्रेनमध्ये शिरताच प्रवासी बसण्यासाठी जागा शोधू लागतात.

Automatic door in Mumbai trains
byu/Novel_Swimmer_8284 inDamnthatsinteresting

या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप व्ह्यूज मिळत आहेत, तर अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. यावर एका युजरने लिहिले की, दररोज असे करणे कसे शक्य आहे? हे पाहून मला खूप काळजी वाटतेय. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही. त्यांना रोज कामावर जावे लागेल, शाळेत जावे लागेल. बहुतेक लोकांसाठी लोकल ट्रेन हा एकमेव पर्याय आहे, यामुळे लोकांना रेल्वे प्रवास आंगवळणी झाला आहे. यावर तिसऱ्या एका युजरने लिहिले की, दरवाजा खरं ऑटोमॅटिक आहे की प्रचंड गर्दी थांबवण्याचा हा प्रयत्न होता.

Story img Loader