ज्या मुलांना लहानपणी ‘दुय्यम धुम्रपानाचा’ (पॅसिव्ह स्मोकिंग) सामना करावा लागतो ती मोठेपणी जास्त आक्रमक बनतात. कॅनडातील मॉंट्रिअल विद्यापीठाच्या संशोधकांनी हा निष्कर्ष मांडला आहे. पालकांच्या धुम्रपानाच्या सवयींमुळे मुलांवर हा वाईट परिणाम होत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
“दुय्यम धुम्रपान खरे पाहता जास्त घातक आहे. जगातील एकूण ४० टक्के लहान मुलांना त्याचा सामना करावा लागतो. अतिलहान वयात तर ते अतिशय घातक आहे. तो काळ मुलांच्या मेंदूचा विकास होण्याचा काळ असतो.” असे या विषयी संशोधन करणा-या लिंडा पगानी म्हणाल्या.
आम्ही एकूण २,०५५ मुलांची त्यांच्या जन्मापासून ते वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत माहिती मिळवली. त्यामध्ये पालकांकडून, मुलांच्या घरातील वागण्याबाबत व शिक्षकांकडून शाळेतील वागण्याबाबत माहिती गोळा केली.
“ज्या मुलांना लहानपनापासून किंवा काहीकाळ दुय्यम धुम्रपानातून जावे लागले आहे, त्या मुलांमध्ये इतर मुलांच्या तुलनेत जास्त आक्रमकपणा आहे. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत मुलांमध्ये हा बदल जाणवतो. या आक्रमकपणामुळे ही मुले प्रचंड विचलित व असामाजिक बनतात.” असे अभ्यासातून पुढे आल्याचे पगानी म्हणाल्या.

Story img Loader