८ जानेवारीपासून अर्ज स्वीकारणार, तीन वर्षांनंतरचे मोठे पाऊल 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एपी, बीजिंग : पुढील महिन्यात चांद्र नववर्षांच्या सुट्टीसाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या चिनी नागरिकांची संभाव्य मोठी संख्या लक्षात घेऊन चीन पर्यटनासाठी पारपत्र वितरित करण्यास सुरुवात करणार आहे. सुमारे तीन वर्षांपासून करोना प्रतिबंधासाठी चीनने घातलेले निर्बंध शिथिल करण्याच्या निर्णयातील हे महत्त्वाचे पाऊल आहे. पारपत्रासाठी ८ जानेवारीपासून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

जगातली सर्वात कठोर करोना प्रतिबंधक नियंत्रणे शिथिल करण्याच्या चीनच्या निर्णयात या नव्या निर्णयाची भर पडली. चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांच्या सरकारने चीनमधील वाढत्या आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी हे निर्णय घेतल्याचे मानले जाते. चीनमधील ‘शून्य कोविड’ (झिरो कोविड) धोरणामुळे लाखो नागरिक घरात अडकून पडले. या विलगीकरणामुळे चीनमध्ये करोनाचा संसर्गदर जरी जागतिक पातळीच्या तुलनेत कमी राहिली तरी चीनच्या सर्वसामान्य जनतेची या धोरणांमुळे कुचंबणा झाली. आर्थिक प्रगतीवर दुष्परिणाम झाल्याने त्यांच्यात व्यापक प्रमाणात असंतोष व निराशा निर्माण झाली. 

 चीनच्या या नव्या निर्णयामुळे २२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या चीनच्या चांद्र नववर्षांच्या काळात देशात मोठय़ा प्रमाणात पर्यटन हंगाम असतो. या काळात आशिया व युरोपमधील महसूल व कमाईच्या प्रतीक्षेत असलेल्या पर्यटनस्थळी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. परंतु चीनमध्ये करोना संसर्ग वाढल्याने ते करोनाचे संक्रमण पसरवण्याचाही धोका तितकाच आहे. खबरदारीचा व प्रतिबंधक उपाय म्हणून जपान, भारत, दक्षिण कोरिया आणि तैवानने चीनमधून येणाऱ्या प्रवाशांना करोना चाचण्या सक्तीच्या केल्या आहेत. २०२० च्या सुरुवातीला करोना महासाथीच्या प्रारंभी चीनने विदेशी नागरिकांना ‘व्हिसा’ व आपल्या नागरिकांना पारपत्र देणे थांबवले होते. 

परदेशी पर्यटकांच्या ‘व्हिसा’बाबत मात्र मौन!

चीनच्या राष्ट्रीय ‘इमिग्रेशन’ विभागाने सांगितले, की ते विदेशी जाणाऱ्या पर्यटकांच्या पारपत्रासाठी ८ जानेवारीपासून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. ‘व्हिसा’ मुदत वाढवण्यासाठी, नूतनीकरणासाठी किंवा पुन्हा प्रदान करण्यासाठी अर्ज घेतले जातील. परंतु ते प्रथम अर्ज करणाऱ्यांना ‘व्हिसा’ कधी दिले जातील, याची कोणतीही निश्चित मुदत या विभागाने सांगितली नाही. चीन परदेशी पाहुण्यांना प्रवेश परवानगी प्रक्रिया यथावकाश संथगतीने पुन्हा सुरू करेल. विदेशी पर्यटकांचा चीनमध्ये येण्याची मुभा नेमकी कधी सुरू होईल, याचे कोणतेही संकेत या विभागाने दिले नाहीत.