राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्यास लोकजनशक्ती पक्षाने विरोध केला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम मानला पाहिजे, असे पक्षाचे सर्वेसर्वा व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनीही अशा प्रकारे अध्यादेश काढण्यास विरोध केला आहे. त्यामुळे या मुद्दय़ावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील मित्रपक्षांमध्ये विरोधाचा सूर असल्याचे उघड झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हिंदुत्ववादी संघटनांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी अध्यादेश काढावा, अशी मागणी केली आहे. मात्र आता भाजपच्या मित्रांनीच विरोध केल्याने पक्षाची कोंडी होण्याची चिन्हे आहेत. याबाबत न्यायालयाचा जो काही निर्णय असे तो सर्वानीच स्वीकारला पाहिज, असे पासवान यांनी सांगितले. पंतप्रधानांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहावी, असे स्पष्ट केल्याने आता यात शंका-कुशंकांना जागा नाही, असे पासवान यांनी सांगितले. याबाबत आमची भूमिका ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विश्व हिंदू परिषदेने अध्यादेश काढावा, असा आग्रह धरला आहे.

महिलांच्या प्रवेशाला पाठिंबा

शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला लोकजनशक्ती पक्षाचा पाठिंबा असल्याचे पासवान यांनी स्पष्ट केले. असा भेदभाव पक्षाला मान्य नाही, असे पासवान यांनी सांगितले. भाजपने जरी याबाबत निदर्शने केली असली केंद्र सरकारने हस्तक्षेप केलेला नाही असे पासवान यांनी निदर्शनास आणून दिले. या मुद्दय़ांवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी पासवान यांनी केली.