मुंबई / नवी दिल्ली : मंगलम ऑरगॅनिक्स लिमिटेडने दाखल केलेल्या व्यापारचिन्ह हक्क (ट्रेडमार्क) उल्लंघनाप्रकरणी उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचे हेतुत: उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी ‘पतंजली’ला साडेचार कोटी रुपयांचा दंड ठोठावला. दुसरीकडे कोविड-१९वर उपचारासाठी ‘कोरोनिल’च्या वापराबाबत समाजमाध्यमांवरून आक्षेपार्ह मजकूर हटविण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना दिले.

पतंजलीने आपल्या कापूर उत्पादनांबाबत स्वामित्व हक्कांचे उल्लंघन केल्याचा दावा करून ‘मंगलम ऑरगॅनिक्स’ या कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने दाव्याची दखल घेऊन ३० ऑगस्ट २०२३ रोजी पतंजलीला कापूर उत्पादने विकण्यापासून प्रतिबंध केला होता. मात्र, त्यानंतरही पतंजलीकडून कापूर उत्पादनांची विक्री सुरू असल्याचा दावा करत मंगलम ऑरगॅनिक्सने पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली व अवमान याचिकाही दाखल केली. पतंजलीने २ जून रोजी प्रतिज्ञापत्र दाखल करून न्यायालयाची माफी मागितली आणि न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याचे आश्वासन दिले. तथापि, पतंजली आयुर्वेदाचे संचालक रजनीश मिश्रा यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात अंतरिम आदेशाचे उल्लंघन केल्याची बाब कबूल केली होती. न्यायालयाच्या मनाई आदेशानंतर ४९,५७,८६१ रुपयांची कापूर उत्पादने विकली गेली. तसेच, २५,९४,५०५ रुपये किमतीची कापूर उत्पादने अद्याप घाऊक विक्रेते किंवा वितरक आणि अधिकृत दुकानांत आहेत व ती संबंधित ठिकाणी ठेवण्यात आल्याचेही पतंजलीने प्रतिज्ञापत्राद्वारे मान्य केले होते. दंडाच्या रकमेपैकी ५० लाख रुपयांची रक्कम न्यायालयाने सुनावणीच्या वेळीच कंपनीला न्यायालयात जमा करण्यास सांगितली होती. आदेशाचे उल्लंघन केल्याच्या पतंजलीच्या कबुलीची न्यायालयाने दखल घेतली होती. तसेच, पतंजलीने आदेशानंतर आणि अलीकडेच, ८ जुलै रोजी कापूर उत्पादने विकली. कंपनीच्या संकेतस्थळावरूनही कापूर उत्पादने विक्रीसाठी सूचिबद्ध करण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले व आदेशाचे वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी पतंजलीला साडेचार कोटींचा दंड भरण्याचे आदेश न्या. रियाज छागला यांच्या एकलपीठाने दिले. दंडाची रक्कम जमा करण्यासाठी कंपनीला दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.

shambhuraj desai
मंत्री शंभुराज देसाईंकडून कायद्याची अवहेलना, उच्च न्यायालयाकडून नाराजी
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Nagpur Bench of Bombay High Court Acquitted woman who arrested in naxalism case
नागपूर : नक्षलवादाच्या प्रकरणात अडवलेल्या महिलेची उच्च न्यायालयाकडून निर्दोष सुटका… पोलीस कारवाईवर प्रश्न
supreme Court on Kolkata Rape case
Kolkata Rape and Murder : कोलकाता पीडितेच्या हत्येआधीचे काही तास कसे होते? सहकाऱ्यांनी काय सांगितलं?
German Bakery Case Court slams jail administration for denying parole to accused Himayat Beg
जर्मन बेकरी प्रकरण : आरोपी हिमायत बेगला पॅरोल नाकारल्यावरून न्यायालयाने कारागृह प्रशासनाला फटकारले
Sugarcane, Delhi High Court, Supreme Court,
ऊस दराचा लढा दिल्ली उच्च न्यायालयात; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
High Court said demanding money by Gesture is not corruption
उच्च न्यायालय म्हणाले, इशाऱ्याने पैशाची मागणी करणे भ्रष्टाचार नव्हे…
K Kavitha Bail
K Kavitha Bail News: के कविता यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात जामीन मंजूर

हेही वाचा >>>Jaya Bachchan : राज्यसभेच्या उपसभापतींनी अमिताभ बच्चन यांचं नाव घेताच खासदार जया बच्चन संतापल्या, नेमकं काय घडलं?

तर पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांना दिल्ली उच्च न्यायालयानेही तडाखा दिला. करोनाच्या उपचारासाठी पतंजलीच्या ‘कोरोनिल’ या औषधाच्या वापराबाबत आक्षेपार्ह मजकूर समाजमाध्यमांवर प्रसृत करण्यावरून २०२१ साली डॉक्टरांच्या विविध संघटनांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी न्या. अनुप जयराम भंभानी यांच्या पीठाने येत्या तीन दिवसांत पतंजलीने ‘एक्स’ समाजमाध्यमावरील मजकूर हटवावा, अन्यथा ‘एक्स’ कंपनीने हा मजकूर काढून टाकावा, असे आदेश दिले. ‘कोरोनिल’ हे औषध केवळ प्रतिकारक्षमता वाढविणारे असताना त्यामुळे करोना संपूर्ण बरा होतो, असा दावा पतंजलीने केला होता.

न्यायालयाच्या आदेशाचे हेतुत: आणि जाणूनबुजून उल्लंघन केले. आदेशाची पायमल्ली करण्याचा पतंजलीचा हेतू होता याबद्दल आपल्या मनात तीळमात्र शंका नाही.न्यायमूर्ती रियाज छागलामुंबई उच्च न्यायालय

या गोळ्यांचा प्रचार आणि जाहिराती सुरू ठेवण्याची परवानगी दिली गेली, तर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच आयुर्वेदासारखी प्राचीन पद्धती बदनाम होऊ शकते. – न्या. अनुप जयराम भंभानीदिल्ली उच्च न्यायालय