पाटण्यातील गांधी मैदानावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी गुरुवारी आणखी एका संशयिताला दिल्लीमध्ये अटक करण्यात आली. मोहंमद अफजल असे या संशयिताचे नाव आहे. एनआयएच्या अधिकाऱयांनी याआधीच स्फोटांच्या आरोपावरून उज्जेर अहमद याला अटक केली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मोहंमद अफजलला अटक करण्यात आली. मोहंमद हा उज्जेरचा नातेवाईक असल्याची समजते.
मोहंमद अफजल आपल्या पत्नीला सोडण्यासाठी दिल्ली विमानतळावर आला होता. त्यावेळीच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे एनआयएचे अधिकारी अधिक चौकशी करीत आहेत. एनआयए आणि बिहार पोलीसांनी या स्फोटांप्रकरणी आतापर्यंत या दोघांसह इम्तियाज अन्सारी, तौसिम आणि अर्शद अहमद यांना अटक केलेली आहे. गेल्या रविवारी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी पाटण्यातील गांधी मैदानात सहा साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यामध्ये सहा जणांचा बळी गेला असून, ८० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा