पाटण्यामधील साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी रांचीतून ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांना चौकशीनंतर सोमवारी सोडून देण्यात आले. या स्फोटांमागील संशयितांचा शोध घेण्यासाठी रांचीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रविवारी रात्रीपासून छापे टाकण्यात येत आहेत.
स्फोटांनंतर तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. मात्र, त्यातून काहीच हाती न लागल्यामुळे अखेर या तिघांना सोडून देण्यात आले. पोलीसांनी छापा टाकलेल्या एका ठिकाणाहून काळी पावडर, स्फोटके बनवण्यासाठी लागणाऱया वस्तू, प्रेशर कुकर आणि दहशतवादी विचारांना प्रवृत्त करणारे साहित्य जप्त केले.

Story img Loader