पाटण्यात झालेल्या बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेले ‘टायमर बॉम्ब’ आणि बोधगया येथील बॉम्बमधील ‘टायमर’ एकाच पद्धतीचे असल्याचे राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले आहे.
पाटण्यातील बॉम्बस्फोट प्रकरणानंतर राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या तुकडीने घटनास्थळावर केलेल्या तपासातून ही माहितीसमोर आली आहे. तसेच घटनास्थळावर तीन स्फोटक साधने(‘एलइडी’) निकामी करण्यात आले आहेत. सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, “पाटणा आणि बोधगया येथील बॉम्बस्फोटांमध्ये वापऱण्यात आलेल्या स्फोटकांमध्ये वापरण्यात आलेल्या ‘टायमर’मध्ये साम्य आढळले आहे. दोन्ही ठिकाणावरील बॉम्बस्फोटांमध्ये ‘लोटस ब्रॅण्ड’चे घड्याळ ‘टायमर’ म्हणून वापरण्यात आले आहे. मात्र, बॉम्ब बनविण्याच्या पद्धतीत भिन्नता ठेवण्यात आली होती. पाटणातील स्फोटके तितकीशी तयारीनिशी बनविण्यात आलेली नाहीत.”