लाच प्रकरणामुळे रेल्वेमंत्री पदावरून पायउतार झालेले पवन कुमार बन्सल यांनी आपण ‘निर्दोष’ असल्याचे सांगत चौकशीत काहीही निष्पन्न होणार नाही असा दावा केला आहे. काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांसह आपल्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
या कथित लाच प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही आणि त्यामुळेच या प्रकरणाच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होऊ शकणार नाही, हे मी आपल्याला निक्षून सांगतो असे बन्सल यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केले.
भाजपाने बन्सल यांच्या कुटुंबियांचा या लाच प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केला आहे, त्याबाबत प्रश्न विचारला असता संतप्त झालेल्या बन्सल यांनी मला आता तुम्हा प्रत्येकाला कुटुंबाची व्याख्या नव्याने शिकवायला हवी की काय असा सवाल उपस्थित केला.
राजीनाम्यानंतर बन्सल यांचे आपल्या कुटुंबासह येथे निवासस्थानी आगमन झाले. त्यानंतर त्यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांशी संवाद साधला. आपला रेल्वे लाच प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी वारंवार स्पष्ट केले.
निर्दोष असल्याचा बन्सल यांचा दावा
लाच प्रकरणामुळे रेल्वेमंत्री पदावरून पायउतार झालेले पवन कुमार बन्सल यांनी आपण ‘निर्दोष’ असल्याचे सांगत चौकशीत काहीही निष्पन्न होणार नाही असा दावा केला आहे. काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांसह आपल्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
First published on: 13-05-2013 at 01:37 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pawan bansal claimed to be innocent