Pawan Khera : काँग्रेस पक्षाचे नेते आणि माध्यम प्रमुख विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी सेबीच्या सदस्य आणि अध्यक्ष होत्या तरीही त्यांनी आयसीआयसीआय बँकेकडून १६ कोटी रुपये पगार म्हणून घेतले. याबाबत बँकेने उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. तसंच ते म्हणाले या देशात बुद्धिबळाचा खेळ चालला आहे. पण नेमकं खेळतंय कोण? या निष्कर्षावर आम्ही पोहचलो नाही. प्यादं म्हणून अनेकांचा वापर केला जातो आहे असंही पवन खेरा ( Pawan Khera ) म्हणाले.

पवन खेरा यांनी काय म्हटलं आहे?

माधवी पुरी बुच या सेबीच्या सदस्य आणि अध्यक्ष होत्या. तरीही सेबीसह एकूण तीन ठिकाणांहून त्या पगार घेत होत्या. सेबी मार्केट रेग्युलटरी आणि अध्यक्ष यांची निवड पंतप्रधा आणि गृहमंत्री करतात. जेव्हा माधवी पुरी बुच यांनी निवड करण्यात आली तेव्हा त्या सेबीकडून, ICICI बँक आणि ICICI प्रेड्युंशियल यांच्याकडून तीन पगार घेत होत्या. असा आरोप पवन खेरा ( Pawan Khera ) यांनी केला

AAP leader and Delhi minister Kailash Gehlot resigned from party
Kailash Gehlot resigns: विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा झटका; कॅबिनेट मंत्री कैलाश गेहलोत यांनी आरोपांची राळ उठवत दिला राजीनामा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Reserve Bank,
“मी लष्कर-ए-तोयबाचा सीईओ बोलतोय, तुमच्या मागचा रस्त्यावर…”; रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन!
Singh said Modi treated Maharashtra like step mother running 2 lakh crore projects in Gujarat
“पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्राला सावत्र वागणूक,” संजय सिंह यांचा आरोप
Cook on Chief Minister Varsha bungalow Arvi constituency
मुख्यमंत्र्यांच्या वर्षां बंगल्यावरील खानसामा ‘ ईथे ‘ काय करतोय ?
collector bro kerala ias officer n prashantha suspended
Kelara IAS Officer: ‘कलेक्टर ब्रो’ IAS अधिकारी निलंबित; वरीष्ठ अधिकाऱ्यावर जाहीररीत्या आगपाखड केल्यावरून कारवाई!
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!

माधबी पुरींनी राजीनामा दिला पाहिजे

पवन खेरा म्हणाले, २०१७ ते २०२४ या कालावधीत माधबी पुरी कोट्यवधी रुपये कमवत होत्या. त्यांनी जे वर्तन आणि कृती केली ती सेबीच्या कलम ५४ चं उल्लंघन आहे. त्यामुळे माधबी पुरी बुच यांना थोडी जरी लाज वाटत असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. असं पवन खेरा ( Pawan Khera ) म्हणाले.

हे पण वाचा- ‘सेबी’ने अनिल अंबानींवर भांडवली बाजारात व्यवहारास पाच वर्षांची बंदी का घातली?

माधबी पुरी यांचा पंतप्रधान मोदींना सवाल

काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा म्हणाले, “सेबी शेअर बाजारावर नियंत्रण ठेवण्याचं महत्त्वाचं काम करणारी संस्था आहे. पण सेबीच्या अध्यक्षांची निवड कोण करतं? कॅबिनेटमध्ये निवड समिती आहे ज्याचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत. त्यामुळे सेबीच्या अध्यक्षांच्या निवडीसाठी हे दोघे जबाबदार आहेत. माधबी पुरी बुच यांनी २०१७ ते २०२४ या कालावधीत ICICI बँकेकडून १६ कोटी ८० लाख रुपये पगार म्हणून घेतले आहेत. जर तुम्ही पूर्णवेळ सेबी सदस्य आहात तर या बँकेकडून पगार कसा घेतला? ” असं पवन खेरांनी ( Pawan Khera ) म्हटलं आहे.

पवन खेरांनी उपस्थित केलेले प्रश्न काय?

SEBI च्या अध्यक्षपदाच्या निवडीचे निकष काय आहेत?

सेबीच्या अध्यक्ष आयसीआयसीआय बँकेकडून पगार घेत आहेत याची माहिती पंतप्रधानांना आहे का?

ICICI बँकेबाबत सेबीच्या अध्यक्ष निर्णय घेत आहेत याची पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहिती आहे का?

सेबी चेअरमनबाबत इतके सगळे पुरावे समोर येऊनही त्यांना कोण वाचवत आहे आणि का? हे प्रश्न पवन खेरांनी उपस्थित केले आहेत. ICICI बँकेची काही प्रकरणं सेबीकडे प्रलंबित आहेत. त्यावर आता निर्णय घेतले जात आहेत. तुमचा नवा भारत आहे तर काँग्रेस पक्षही नवा आहे असंही पवन खेरांनी म्हटलं आहे.