नवी दिल्ली : दिल्लीच्या पहाडगंज भागात चार कोटी रुपयांच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली होती. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली होती. मात्र, पोलिसांनी २४ तासांत या चोरीचा छडा लावला आहे. १०० रुपयांच्या पेटीएम व्यवहारावरुन पोलिसांनी ही चोरी उघडकीस आणली आहे. याप्रकरणी चार आरोपींना जयपूर येथून पोलिसांनी अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बुधवारी पहाटे मध्य दिल्लीमधील पहाडगंज भागात नकली पोलिसांच्या वेषात आलेल्या चार जणांनी कुरिअर कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांच्या डोळ्यात मिर्चीची चटणी टाकून लुटले. त्यांच्यांकडे असलेले चार कोटी रुपयांचे दागिने हिसकावून चोरट्यांनी पळ काढला होता. पहाटे ४ ते ५ दरम्यान ही घटना घडली होती. याबाबत स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार एका खासगी कुरिअर कंपनीत काम करतात. ही कंपनी दागिने आणि महागड्या वस्तू ने-आण करते. बुधवारी पहाटे तक्रारदार आणि त्यांचे सहकारी चंदीगड आणि लुधियानासाठी माल घेऊन निघाले होते. तेव्हा, चार आरोपींनी आडवून त्यांना लुटले.

पोलिसांनी तपासावेळी कंपनीजवळ असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तेव्हा हे आरोपी गेल्या १५ दिवसांपासून कंपनीच्या परिसरात रेकी करत असल्याचे आढळले. सीसीटीव्हीच्या एका व्हिडीओमध्ये एक आरोपी सकाळी एका टपरीवर चहा पीत असल्याचे दिसले. या आरोपीने खासगी कॅब चालकाकडून १०० रुपये घेतले होते. कॅब चालकाशी संवाद साधताना आरोपी मोबाईल वापरताना आढळून आला. याबाबात पोलिसांनी चहाच्या दुकानदाराकडे चौकशी केली. त्यानं सांगितलं, आरोपीने त्याच्याकडून चहा विकत घेतला. मात्र, त्याच्याकडे रोख रक्कम नव्हती.

पुढे चहा टपरीवाल्याने म्हटलं की, आरोपीने कॅब चालकाला थांबवलं आणि पैसे डिजीटल माध्यमातून त्याला दिल्यावर १०० रुपये घेतले. त्यानंतर पोलिसांनी कॅब चालकाची सर्व माहिती मिळवली. त्याच्याजवळ पोलिसांनी चौकशी केली असता कॅब चालक म्हणाला, पेटीएम व्यवहाराद्वारे आरोपीने त्याला १०० रुपये दिले आणि त्याच्याकडून रक्कम घेतली होती. मग पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पेटीएम मुख्यलयाशी संपर्क साधला. तेव्हा त्यांना आरोपीचा फोन नंबर आणि पत्ता आढळला. तो पत्ता होता नजफगढचा.

पोलिसांनी तत्काळ नजफगढ येथे पथके पाठवली. मात्र, पोलीस पोहचण्यापूर्वी आरोपी आपल्या साथीदारांसह पळून गेला होता. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींचे नंबर मिळवत त्यांचा पाठलाग केला. तेव्हा ते जयपूरमधील एका घरात आढळून आले. तेथून पोलिसांनी चारही आरोपींनी अटक केली.
याप्रकरणी डीसीपी श्वेता चौहान म्हणाल्या की, दागिन्यांची अंदाजे किंमत सुमारे ४ कोटी रुपये आहे. मुंबई, अहमदाबाद, सुरत आणि अन्य काही ठिकाणांहून हा माल आला असल्याने त्याची किंमत तपासली जात आहे.