फुटीरतावादी नेता मसरत आलम याची सुटका करण्याच्या निर्णयावरून भाजपने जोरदार हल्ला चढविला असला तरीही पीडीपीने आपल्या निर्णयाचे एका प्रकारे समर्थनच केले आहे. फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे या उद्देशानेच आलमला सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पीडीपीने म्हटले आहे.
आलम याची सुटका करण्याच्या निर्णयाचे आम्ही समर्थन करतो. न्यायालयाने त्याच्या सुटकेचा आदेश दिला आणि आम्ही त्या आदेशाची अंमलबजावणी केली, असे पीडीपीचे नेते आणि आमदार फिरदौस टाक यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. सलोखा निर्माण करण्यासाठी आपल्याला कधी तरी सुरुवात करावीच लागते, फुटीरतावाद्यांशी आपल्याला कधी चर्चा केली पाहिजे ते समजून घेणे गरजेचे आहे आणि त्यासाठीच पोषक वातावरणाची गरज आहे, असेही टाक म्हणाले.
फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्याच्या उद्देशानेच मसरतची सुटका
फुटीरतावादी नेता मसरत आलम याची सुटका करण्याच्या निर्णयावरून भाजपने जोरदार हल्ला चढविला असला तरीही पीडीपीने आपल्या निर्णयाचे एका प्रकारे समर्थनच केले आहे.
First published on: 10-03-2015 at 06:29 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pdp defends masarat alams release