फुटीरतावादी नेता मसरत आलम याची सुटका करण्याच्या निर्णयावरून भाजपने जोरदार हल्ला चढविला असला तरीही पीडीपीने आपल्या निर्णयाचे एका प्रकारे समर्थनच केले आहे. फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे या उद्देशानेच आलमला सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पीडीपीने म्हटले आहे.
आलम याची सुटका करण्याच्या निर्णयाचे आम्ही समर्थन करतो. न्यायालयाने त्याच्या सुटकेचा आदेश दिला आणि आम्ही त्या आदेशाची अंमलबजावणी केली, असे पीडीपीचे नेते आणि आमदार फिरदौस टाक यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. सलोखा निर्माण करण्यासाठी आपल्याला कधी तरी सुरुवात करावीच लागते, फुटीरतावाद्यांशी आपल्याला कधी चर्चा केली पाहिजे ते समजून घेणे गरजेचे आहे आणि त्यासाठीच पोषक वातावरणाची गरज आहे, असेही टाक म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा