एअर इंडियाच्या विमानात एका वृद्ध महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याची घटना समोर आल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी ही गटना घडली होती. या प्रकरणातील मुंबईतील आरोपी शंकर मिश्रा याला तो नोकरी करत असलेल्या कंपनीने कामावरून काढून टाकले आहे. तसेच त्याला अटकही करण्यात आली आहे. मात्र माझ्या मुलाला फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझा मुलगा ७२ वर्षीय महिलेशी गैरवर्तणूक करू शकत नाही, असा दावा आरोपी शंकर मिश्राच्या वडिलांनी केला आहे. असे असतानाच ज्या विमानात ही घटना घडली,त्याच विमानातील एका प्रवाशाने त्या दिवशी नेमके काय घडले होते? याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्याने विमान प्रशासनाने त्यांची जबाबदारी चोखपणे न बजावल्याचा आरोप केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “फडणवीसांनी मध्यस्थी करावी” म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “आम्हाला…”

आरोपी मिश्रा याने ज्या विमानात प्रवासादरम्यान महिलेवर लघुशंका केली होती, त्याच विमानात एस भट्टाचार्जी प्रवास करत होते. त्यांनी त्यावेळी नेमके काय घडले होते, याबाबत सविस्तर सांगितले आहे. “दुपारच्या जेवणानंतर ही घटना घडली. आरोपीने त्यावेळी मद्यप्राशन केलेले होते. मला आरोपी एकच प्रश्न परत-परत विचारत होता. मी दुपारचे जेवण केले. त्यानंतर आरोपीकडे लक्ष द्यावे अशी फ्लाइट अटेंडंटला विनंती केली,” अशी माहिती भट्टाचार्जी यांनी दिली.

“ज्या महिलेवर आरोपीने लघुशंका केली, ती महिला सभ्य दिसत होती. आरोपीने लघुशंका केल्यानंतर दोन कनिष्ठ एअर होस्टेस तेथे होत्या. त्यांनी त्या महिलेला साफ केले. ती घटना घडल्यानंतर मी विमानातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेलो आणि महिलेला दुसरी जागा द्यावी, अशी विनंती केली. मात्र त्यांनी तसे करण्यास नकार दिला. महिलेची जागा बदलायची असेल तर आम्हाला विमानाच्या कॅप्टनला तसे विचारावे लागेल, असे मला त्या अधिकाऱ्यांनी सांगितले,” असे भट्टाचार्जी यांनी सांगितले.

हेही वाचा >>> Air India peeing case: महिलेच्या अंगावर लघुशंका करणाऱ्या आरोपीला अखेर बेड्या, बंगळुरूमधून पोलिसांनी घेतलं ताब्यात!

विमानातील अधिकाऱ्यांनी महिलेला दुसरी जागा देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने लघुशंका केलेल्या सिटवर एक ब्लँकेट ठेवण्यात आले. त्या सिटवर लघवीचा वास येत होता. विमानातील अधिकाऱ्यांना त्या महिलेला आरोपीची जागा देता आली असती. मात्र त्यांनी तसे केले नाही. विमानातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडायला हवे होते. विमानातील कर्मचाऱ्यांनी घडलेली घटना संबंधित अधिकारी किंवा विभागाला कळवायला हवी होती, मात्र तसे घडले नाही,” असा आरोपही भट्टाचार्जी यांनी केला.

हेही वाचा >>> एअर इंडियाच्या विमानात लघुशंका करणाऱ्या व्यक्तीला ब्लॅकमेल केलं जातंय? वडिलांनी केला खळबळजनक दावा!

दरम्यान, २६ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये घडलेल्या घटनेनंतर या प्रकरणातील आरोपी फरार होता. या आरोपीला दिल्ली पोलिसांनी शनिवारी सकाळी बंगळुरूमधून अटक केली . तसेच तो नोकरीवर असलेल्या कंपनीनेही त्याला कामावरून काढून टाकले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Peeing in air india flight case co passenger told detail information prd