पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून सध्या देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर आणि दोन मंत्र्यांची हेरगिरी केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अश्विनी वैष्णव आणि प्रल्हाद पटेल या दोन केंद्रीय मंत्र्यांची नाव समोर आली आहेत. लीक झालेल्या डेटामध्ये ३०० भारतीय मोबाईल नंबर आहेत. त्यापैकी ४० मोबाईल नंबर हे भारतीय पत्रकारांचे आहेत. तसेच विरोधी पक्षातील ३ मोठे नेते, मोदी सरकारमधील दोन केंद्रीय मंत्री, संरक्षण संस्थेतील प्रमुख अधिकारी आणि उद्योगपतींचा यात समावेश आहे. द वायरनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. या मोबाईल नंबरवर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पाळत ठेवण्यात आली होती, असा खुलासाही यात करण्यात आला आहे.
पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांचाही फोन टॅप करण्यात आला आहे. प्रशांत किशोर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तेव्हा भाजपाचं सरकार आलं होतं. त्यानंतर भाजपा विरोधी पक्षांनी त्यांच्याशी संपर्क साधला. तसेच सध्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तामिळनाडुत एमके स्टॅलिन यांच्या विजयात त्यांचं मोलाचं योगदान होतं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाचा अभिषेक बॅनर्जी हाही निशाण्यावर असल्याचं सांगण्यात आलं आहे. माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचा नंबर यात आहे. हा नंबर ते २०१९ पूर्वी वापरत होते.
Pegasus spyware : “मी पाच वेळा मोबाईल बदलला पण…” प्रशांत किशोर यांचं विधान!
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया याच्या पीएसचा नंबरही या यादीत आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी वसुंधरा राजे असताना हेरगिरी केल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री स्मृती इराणीचे ओएसडी संजय काचरू यांचंही नाव या यादीत आहे. तसेच विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रविण तोगडिया यांचा नंबर सुद्धा इस्रायली सॉफ्टवेअरच्या डेटाबेसमधून मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.
Any form of illegal surveillance isn’t possible with checks & balances in our laws &robust institutions. In India, there’s a well-established procedure through which lawful interception of electronic communication is carried out for purpose of national security: IT Minister in LS pic.twitter.com/KL7mIjIvWe
— ANI (@ANI) July 19, 2021
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबतच्या बातम्यांचं खंडन केलं आहे. जाणीवपूर्णव अशा बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी करण्यासाठी हे केलं जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. भारताच्या विकासात जाणीवपूर्वक आडकाठी टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही या बातम्यांचं खंडन केलं आहे.