येमेनच्या हुती बंडखोरांनी लाल समुद्रात पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. हुती बंडखोरांनी तीन व्यावसायिक जहाजांवर बॅलिस्टिक क्षेपणास्र डागून हल्ला केला, याबाबत या बंडखोरांच्या प्रवक्त्यानीच अधिकृत माहिती दिली. दोन अमेरिकी जहाजांना सशस्त्र ड्रोन आणि नौदल क्षेपणास्त्राने लक्ष्य करण्यात आल्याची माहितीही या प्रवक्त्याकडून देण्यात आली. हुती बंडखोरांनी दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी युनिटी एक्स्प्लोरर आणि नंबर नाइन या दोन इस्रायली जहाजांना लक्ष्य करण्यात आलं होतं.

ब्रिटीश सागरी सुरक्षा कंपनी एंब्रेने सांगितले की, लाल समुद्रात प्रवास करत असताना एका जहाजावर ड्रोनने हल्ला केला. यासोबतच येमेनपासून १०१ किलोमीटर अंतरावर असलेल्या हुती बंडखोरांनी आणखी एका जहाजालाही लक्ष्य केले. लाल समुद्रात अमेरिकन युद्धनौका आणि अनेक व्यावसायिक जहाजांवर हल्ला करण्यात आल्याचे पेंटागॉननेही म्हटले आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम संपल्यानंतर हुती बंडखोर लाल समुद्रात इस्रायली जहाजांना लक्ष्य करत राहतील, असंही हुती बंडखोरांनी स्पष्ट केलं होतं.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

पेंटागॉनने म्हटलं की “लाल समुद्रातील यूएसएस कार्नी आणि व्यावसायिक जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबाबतच्या अहवालांची माहिती मिळाली आहे. एका अमेरिकन अधिकाऱ्याने असोसिएटेड प्रेसला सांगितले की, येमेनमधील साना येथे सकाळी १० वाजता हल्ला सुरू झाला आणि सुमारे पाच तास चालला.

हेही वाचा >> भारताकडे येणाऱ्या व्यापारी जहाजाचे अपहरण करणारे हूती आहेत तरी कोण?

गेल्या महिन्यात, हुती बंडखोरांनी एक इस्रायली जहाज ताब्यात घेतले होते. त्याचा एक व्हिडिओही जारी केला होता. ज्यामध्ये ते हेलिकॉप्टरमधून जहाजात शिरताना दिसत होते. युद्ध सुरू झाल्यापासून हुती बंडखोर इस्रायल आणि अमेरिकेविरोधात संतापले आहेत. हुतींनी काही काळ अमेरिकन लोकांना थेट लक्ष्य केले नाही. हमास आणि इस्रायल यांच्यात युद्धात हुती बंडखोर हमासच्या समर्थनार्थ आहेत. त्यामुळेच ते सातत्याने इस्रायलवर हल्ले करत आहेत.

कोण आहेत हे हूती ?

मूलतः हूती ही एक येमेनच्या सुन्नी शासनाविरोधात ‘झायदी’ नावाच्या शिया मुस्लिम गटाने चालवलेली चळवळ आहे. जागतिक पातळीवर हा हूतींचा गट दहशतवादी संघटना म्हणून ओळखला जातो. हूतींना पाठीशी घालण्याचा आरोप इराणवर मोठ्या प्रमाणात होतो. येमेनच्या उत्तरेकडील वेगवेगळ्या भागात या हूतींचे मूळ आहे. २० व्या शतकाच्या उत्तरार्धात हूतींनी शिया इस्लामच्या ‘झायदी’ शाखेसाठी धार्मिक पुनरुज्जीवन चळवळ सुरू केली. ‘झायदी’ यांनी एकेकाळी येमेनवर राज्य केले होते, परंतु नंतर त्यांना आर्थिक अडचणींचा आणि उत्तरेकडील सीमांतीकरणाचा सामना करावा लागला होता. शिया मुस्लीम हे इस्लामी जगामध्ये अल्पसंख्याक आहेत, या अल्पसंख्याक गटातील ‘झायदी’ हे अधिक अल्पसंख्याक आहेत. इराण, इराक आणि इतर विविध प्रदेशांमध्ये प्राबल्य असलेल्या शियांपेक्षा ते आचरण करत असलेली शिकवण आणि श्रद्धा यांमध्ये लक्षणीय भिन्नता आढळते.

Story img Loader