आपल्या वादग्रस्त विधानांनामुळे कायम चर्चेत राहणाऱ्या भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. ”जे खरोखर देशभक्त आहेत, ते हेमंत करकरेंना देशभक्त म्हणत नाहीत.” असं त्यांनी म्हटलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

”एक आणीबाणी लागली होती १९७५ मध्ये आणि एक आणीबाणी सारखी परिस्थिती झाली होती २००८ मध्ये, ज्या दिवशी मालेगाव स्फोटात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुरला अटक करण्यात आली होती. मी स्वतः ती परिस्थिती सहन केली आहे, पाहिली आहे व ऐकली आहे. माझे गुरूजी ज्यांनी मला इयत्ता आठवीत शिकवलं, त्यांची त्या हेमंत करकरेने ज्याला लोक देशभक्त म्हणतात, पण खरोखरच जे देशभक्त आहेत ते त्यांना देशभक्त म्हणत नाहीत. त्यांनी आम्हाला शिकवणाऱ्या गुरूजींची बोटं तोडली. सांगा ती काय करत होती? मी आपलं घर वर्षांपूर्वी सोडलं होतं, जेव्हा मी संघटनमंत्री होती. देशासाठी मी जीवन समर्पित केलं होतं. मात्र भीती निर्माण करण्यासाठी आमच्या शिक्षकांची देखील बोटं तोडली. हे कशासाठी होतं, हे लोकशाहील धरून होतं का?” असं साध्वी प्रज्ञा सिंह यांनी म्हटलेलं आहे.

साध्वींचा हा खळबळजनक विधानाचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची देखील शक्यता आहे.  मालेगाव स्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी अटक केली होती.

तर, कोविडमुळे होणारा फुफ्फुसातील संसर्ग गोमूत्र प्यायल्याने बरा होऊ शकतो, असं विधान या अगोदर  भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी केलं होतं. गोमूत्र प्यायल्याने करोनासुद्धा होत नसल्याचंही त्यांनी सांगितल होतं.

गोमूत्र पिते त्यामुळेच मला करोना झालेला नाही -खासदार प्रज्ञा ठाकूर

“देशी गायीचे गोमूत्र आपण प्यायलो तर फुफ्फुसाचा संसर्ग होत नाही. मला खूप त्रास होतो. पण मी रोज गोमूत्र पिते. यामुळेच करोनासाठी कोणतेही औषधे घ्यायची गरज लागत नाही. मला करोनाही झाला नाही”,  असे साध्वी प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या होत्या.