सतत दहशतीत आणि संघर्षात असलेल्या श्रीनगरमध्ये रविवारी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जम्मू आणि काश्मीरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी या तिरंगा रॅलीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. दल सरोवराच्या काठावर SKICC जवळ आयोजित कार्यक्रमात वकील, माजी हुर्रियत नेते, व्यापारी आणि अनेक लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. ‘आझादी का अमृत महोत्सवा’च्या अंतर्गत आयोजित ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. एकता आणि स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून नागरिकांना राष्ट्रध्वज स्वीकारण्यास प्रोत्साहित करणे हा या रॅलीमागचा उद्देश होता. ग्रेटर काश्मीर या वृत्तसंकेतस्थळाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> जम्मू-काश्मीरचे तिरंग्यावर प्रेम; सिन्हा

सर्व वयोगटातील आणि क्षेत्रातील लोकांचा सहभाग असलेली ही रॅली SKICC ते शांत बोटॅनिकल गार्डनपर्यंत काढण्यात आली होती. व्यापारी फरहान किताब म्हणाले, “काश्मीरच्या लोकांसाठी हा खरोखरच खूप आनंदाचा क्षण होता. मी शाळेत असताना आम्ही अशा रॅली काढायचो.”

या रॅलीत सहभागी झालेल्या प्रायव्हेट स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष गुलाम नबी वॉर यांनी देशाचे आभार मानले. निमंत्रित आणि सहभागींमध्ये काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (केसीसीआय) माजी अध्यक्ष शेख आशिक आणि ट्रेड असोसिएशनचे मुहम्मद यासीन, वकील गुलाम नबी शाहीन, मुश्ताक अहमद छाया, जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ) चे जाविद मीर आणि अजाज अहमद वॉर हेसुद्धा सहभागी झाले होते. शेख आशिक म्हणाले, “ही एक नवीन सुरुवात आहे. या रॅलीने होत असलेल्या बदलाचे चित्रण करण्याचे उत्कृष्ट काम केले आहे.”

हेही वाचा >> Independence Day 2023 : लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी, १८०० विशेष अतिथी, सेल्फी पॉइंट आणि…

ध्वज फडकावणे आव्हानात्मक होते

अभियांत्रिकीचा विद्यार्थी मुहम्मद इद्रीस म्हणाला, “ध्वज हा भारताच्या विचाराचे प्रतिनिधित्व करतो. ज्यामध्ये काश्मीर हा भारतीय राष्ट्राचा गाभा आहे. काश्‍मीर अशी जागा होती जिथे तिरंगा फडकवणे आव्हानात्मक होते. आता ते सर्व बदलले आहे.”

पंतप्रधानांनी देशाच्या शहीद सैनिकांना सन्मानित करण्यासाठी ‘मेरी माती मेरा देश’ ही नवीन मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यानिमित्ताने देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

रॅलीला जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि मुख्य सचिव अरुण कुमार मेहता, गृह सचिव आरके गोयल, डीजीपी दिलबाग सिंग, विशेष डीजी सीआयडी आरआर स्वेन, विभागीय आयुक्त काश्मीर विजय कुमार बाधुरी उपस्थित होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People from different ideological backgrounds participate in tiranga rally independence day 2023 sgk