लोकप्रतिनिधींच्या कायद्यामध्ये दुरूस्ती करून तुरुंगात किंवा पोलीस कोठडीत असलेल्यांनाही निवडणूक लढविता येईल. अशी तरतूद करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार) परवानगी दिली.
न्यायालयाच्या नव्या दुरूस्त केलेल्या कायद्यानुसार, पोलीस कोठडीमध्ये किंवा तरुंगात असल्याच्या कारणावरून एखाद्यावर निवडणूक लढविण्यास बंदी घालता येणार नाही. त्यामुळे असे व्यक्तीही निवडणूक लढविण्यास पात्र आहेत. याआधी सर्वोच्च न्यायालयाने १० जुलै रोजी पोलीस कोठडीत किंवा तुरूंगात असलेल्यांना निवडणूक लढविता येणार नाही असा निर्णय दिला होता. मात्र, आता अशी तरदूत रद्द करणारी घटनादुरूस्ती न्यायालयाने केली आहे.
तुरूंगातूनही निवडणूक लढविता येणार!; सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
लोकप्रतिनिधींच्या कायद्यामध्ये दुरूस्ती करून तुरुंगात किंवा पोलीस कोठडीत असलेल्यांनाही निवडणूक लढविता येईल. अशी तरतूद करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार) परवानगी दिली.
First published on: 19-11-2013 at 05:17 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People in police custody or jail can contest elections supreme court