महाराष्ट्रात मराठी भाषेचे पतन होत असताना इतर राज्य मात्र त्यांची भाषा जतन करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. कर्नाटक हे राज्य मातृभाषेसाठी पूर्वीपासून आग्रही असल्याचे अनेकदा दिसले आहे. सीमावर्ती भागातील मराठी बांधवांनी कन्नडमध्येच व्यवहार करावेत, यासाठीही अनेकदा तिथे संघर्ष उडालेला आहे. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कन्नडीगांसाठी केलेले एक आवाहन चर्चेचा विषय ठरत आहे. कन्नडीगांनी आपल्या भाषेचा अभिमान बाळगला पाहीजे. यासाठी राज्यातील प्रत्येकाने कन्नडमध्येच बोलले पाहीजे, इतर दुसऱ्या भाषांचा वापर करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्नाटक विधिमंडळाच्या पश्चिम द्वाराजवळ उभारण्यात आलेल्या नाददेवी भूवनेश्वरी मातेच्या पुतळ्याचे उद्घाटन करत असताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कन्नड भाषेबद्दल आपले विचार व्यक्त केले.

आता उशिरा येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची खैर नाही; केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल

“कर्नाटकमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाने कन्नडमध्येच बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कन्नड वगळता इतर कोणतीही भाषा बोलली जाणार नाही, अशी शपथ सर्वांनी घ्यावी. कन्नड लोक उदार असल्यामुळेच आता इतर भाषा बोलून आपण कर्नाटकमध्ये राहू शकतो, असे वातावरण निर्माण झाले आहे. हीच परिस्थिती तुम्हाला तमिळनाडू, आंध्रप्रदेश किंवा केरळ या राज्यात दिसणार नाही. तिथे फक्त त्यांच्या मातृभाषेत संवाद साधला जातो. त्यामुळे आपणही आपल्याच मातृभाषेत संवाद साधला पाहिजे. हीच आपल्यासाठी अभिमानाची बाब असेल”, अशी भावना सिद्धरामय्या यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केली.

कर्नाटकमध्ये कानडी वातावरण निर्माण करणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे इथे राहणाऱ्या सर्वांनीच कन्नडमध्ये बोलले पाहिजे. कन्नड भाषेबद्दल जिव्हाळा वाढला पाहिजे, कन्नड भाषेबरोबरच आपला देश, आपली भूमी याबद्दलही प्रत्येकाने अभिमान बाळगायला हवा, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राज्यात ओबीसी-मराठा आरक्षणावरून संघर्ष, संजय राऊतांनी स्पष्ट केली ठाकरे गटाची भूमिका; म्हणाले…

कर्नाटक विधिमंडळाच्या पश्चिम द्वाराजवळ उभारण्यात आलेल्या नाददेवी भूवनेश्वरी मातेच्या पुतळ्याचे उद्घाटन करत असताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कन्नड भाषेबद्दल आपले विचार व्यक्त केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People living in karnataka should learn kannada said chief minister siddaramaiah kvg
Show comments