उत्तर महाराष्ट्रातील रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. पण या सभेकडे जनतेने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. सभा स्थळी निम्म्या खुर्च्या रिकाम्या आहेत. सभा स्थळी सर्वसामान्य नागरिकांऐवजी कार्यकर्त्यांची गर्दी जास्त दिसत आहे.
सध्या तापमानाचा पारा वाढलेला आहे. लोकांना उन्हाळयाचा त्रास होऊ नये यासाठी सभास्थळी मंडप घालण्याता आला आहे. पण ऐवढे करुनही जनतेने या सभेकडे पाठ फिरवली आहे. रक्षा खडसे महाराष्ट्र सरकारमधील माजी मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई आहेत.
दुपारी एक वाजता सभा आयोजित करण्यात आली होती. पण मुख्यमंत्री दुपारी तीनच्या सुमारास दाखल झाले. सकाळी ११.३० वाजल्यापासून कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली होती. यावल, फैजपूर आणि सौदा या ठिकाणाहून कार्यकर्ते आले आहेत. अब की बार मोदी सरकार हे नारे सभेत दिले जात आहेत.