उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या लखनौमधील लुलू मॉलमध्ये विनापरवानगी हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न करणाऱ्या २० जणांवर पोलिसांनी कारवाई केली. यातील २ जणांना अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित आरोपींना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींना न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. हा मॉल ११ जुलैला सुरू झाला. मात्र, शुक्रवारी (१५ जुलै) २० जणांच्या जमावाने हातात भगवे झेंडे घेऊन घोषणाबाजी केली आणि लुलू मॉलमध्ये घुसून हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आरोपींनी विनापरवानगी धार्मिक प्रार्थना करत धार्मिक सद्भावना बिघडवण्याचा आरोप लखनौ पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत केला. या वादानंतर शनिवारी (१६ जुलै) लखनौचे पोलीस उपायुक्त गोपाल कृष्ण चौधरी यांची बदली करण्यात आली. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सुभाषचंद्र शाक्य यांनी नवीन पोलीस उपायुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अजय प्रताप सिंह यांना कर्तव्यात कसूर केल्याचा आणि निष्काळजीपणाचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आलंय. त्यांच्याऐवजी गोसाईगंजचे पोलीस निरिक्षक शैलेंद्र गिरी यांना नियुक्त करण्यात आलं.

नेमकं प्रकरण काय?

मंगळवारी (१२ जुलै) सोशल मीडियावर एक समुह लखनौमधील लुलू मॉलमध्ये नमाज पठण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी मॉलमध्ये नमाज पठणाला विरोध केला. तसेच याच मॉलमध्ये हनुमान पठण करण्याची परवानगी मागितली. प्रशासनाने हनुमान चालिसा पठणाला परवानगी नाकारली. दुसरीकडे गुरुवारी (१४ जुलै) पोलिसांनी लुलू मॉलमध्ये नमाज पठण करणाऱ्यांवर समाजात तेढ निर्माण करणे आणि धार्मिक वातावरण बिघडवण्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : “नोटीस दिल्याशिवाय बांधकाम पाडता येणार नाही”; सर्वोच्च न्यायालयाचे उत्तर प्रदेश सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

या सर्व घटना इथेच थांबल्या नाहीत. उजव्या संघटनांच्या २० जणांच्या समुहाने पोलिसांनी परवानगी नाकारूनही शुक्रवारी (१५ जुलै) हातात भगवे झेंडे घेऊन घोषणाबाजी केली आणि लुलू मॉलमध्ये घुसून हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न केला. यानंतर पोलीस प्रशासनाने आरोपींना अटक करत गुन्हा दाखल केला.