मधुमेहाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींपैकी ५० टक्के लोकांना इतरांपेक्षा हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते, असे इंग्लंडमधील एका पाहणी अहवालात म्हटले आहे. टाइप-२ मधुमेहींनाच हृदयविकाराची शक्यता जास्त असते अशातला भाग नाही, तर बालपणापासून ज्यांना टाइप १ प्रकारचा मधुमेह झालेला आहे अशांनाही हृदयविकाराची शक्यता जास्त असते.
नॅशनल डायबेटिस ऑडिटच्या पाहणीत २०१० व २०११ मध्ये २० लाख मधुमेही व्यक्तींची पाहणी करण्यात आली. त्यात इंग्लंड व वेल्समधील व्यक्तींचा समावेश होता असे ‘डेली मेल’च्या वृत्तात म्हटले आहे. या पाहणीनुसार मधुमेहाच्या १४,४७६ रुग्णांना २०१० व २०११ मध्ये हृदयविकाराचा झटका आल्याचे दिसून आले. हा आकडा अपेक्षेपेक्षा ४६९४ने अधिक होता. २०१० व २०११ मध्ये ४५ हजार मधुमेहींपैकी १७,७०० जणांना (८५ टक्के) हृदयाचा आजार झाल्याचे दिसून आले. हा आकडा अपेक्षेपेक्षा २७,३०० एवढा अधिक आहे.
सर्वसामान्य लोकांपेक्षा या मधुमेहींना मृत्यूचा धोका ४० टक्के असतो. २०११ मध्ये ६५,७०० मधुमेहींचा मृत्यू झाला. प्रत्यक्षात ४७,००० मृत्यू अपेक्षित होते. अहवालानुसार इंग्लंडमध्ये २२,२०० तर वेल्समध्ये १९०० मधुमेहींचे मृत्यू जास्त झाले. इंग्लंडमध्ये २८ लाख लोकांना मधुमेह असून साडेआठ लाख लोकांना मधुमेह असल्याचे माहीतच नाही.
टाइप १ प्रकारचा मधुमेह हा बालपणातच होतो. तो इन्शुलिनच्या इंजेक्शनने नियंत्रित करता येतो. टाइप २ मधुमेह हा अनारोग्यकारक जीवनशैलीशी संबंधित असतो. दहापैकी नऊजणांना टाइप-२ मधुमेह झालेला दिसून येतो. यात शरीर हळूहळू रक्तातील साखरेवर प्रक्रिया करण्याची क्षमता गमावून बसते, त्यामुळे शरीरातील अवयवांच्या कार्यावर परिणाम होतो. महिलांमध्ये मधुमेहाने मृत्यूची शक्यता पुरुषांपेक्षा जास्त असते. टाइप १ मधुमेहात महिलांची मृत्यूची शक्यता १४२ टक्के, तर पुरुषांची १३० टक्के असते, तर टाइप २ मधुमेहात महिलांची मृत्यूची शक्यता ४० टक्के तर पुरुषांची ३३ टक्के असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा