संसदेवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी अफझल गुरू याला तिहार कारागृहाच्या परिसरातच दफन करण्यात आले होते, त्या ठिकाणाला भेट देण्याची परवानगी त्याच्या कुटुंबीयांना देण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंग यांनी सांगितले. अफझल गुरूला गेल्याच आठवडय़ात फासावर लटकविण्यात आले आणि कारागृहाच्या परिसरातच त्याला दफन करण्यात आले.
अफझल गुरूच्या कुटुंबीयांना तिहार कारागृहात येऊन दफनविधीच्या ठिकाणी प्रार्थना करावयाची असल्यास त्याला आमची काहीच हरकत नाही, असे सिंग यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. भेटीचा दिवस निश्चित करण्यासंदर्भात तिहार कारागृहाचे प्रशासन लवकरच निर्णय घेईल, असे सिंग म्हणाले.

Story img Loader