पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना सुरक्षेच्या कारणास्तव इस्लामाबादमधील त्यांच्या फार्म हाऊसमधून कराची येथील नौदलाच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कराची येथील ‘पीएनएस शिफा’ रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असून तेथील अतिदक्षता विभागात त्यांना हलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यासंबंधी त्यांचे प्रवक्ते किंवा पक्षाकडून काही सांगण्याचे टाळण्यात आले. मात्र, ‘पीएनएस शिफा’ येथे मुशर्रफ यांच्यावरील उपचार व सुरक्षेसाठी विशेष योजना आखण्यात येत असल्याचे वृत्त ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ या वृत्तपत्राने दिले आहे. मुशर्रफ यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे एक विशेष पथकही नियुक्त करण्यात आले आहे. या रुग्णालयाच्या परिसरात अनावश्यक लोकांची वर्दळ थांबविण्यासाठी फलकही लावण्यात आले आहेत.रावळपिंडी किंवा इस्लामाबाद येथे मुशर्रफ यांच्या जिवाला गंभीर धोका असल्यामुळे त्यांना कराचीत हलविण्याचे ठरविण्यात येत आहे.
दरम्यान, मुशर्रफ यांना कराचीत हलविण्याच्या प्रस्तावासंबंधी आपल्याला कोणतीही कल्पना नाही, असे मुशर्रफ यांचे नवनियुक्त वकील रझा बोखारी यांनी सांगितले. मुशर्रफ यांना हलविण्यात येणार नसल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा