पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि पाकिस्तान मुस्लिम लीगचे प्रमुख परवेझ मुशर्रफ यांना गुरूवारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, मुशर्रफ त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियांबरोबर असताना त्यांना चक्कर आली. यानंतर त्यांना कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत पीएनएस शिफा रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांचे पथक मुशर्रफ यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. मुशर्रफ सध्या ७२ वर्षांचे असून यापूर्वीही अनेकदा त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी उद्भवल्या आहेत.

Story img Loader