पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांना गुरुवारी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना तातडीने लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  देशद्रोहाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी जात असताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे गुरुवारी ते तिसऱ्यांदाही न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत.
बुधवारी रात्रीपासूनच मुशर्रफ यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यावर औषधोपचार केले आणि त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता, असे मुशर्रफ यांच्या ‘एपीएमएल’ पक्षाच्या प्रवक्त्या आसिया इशाक यांनी सांगितले. दरम्यान, मुशर्रफ यांना उपचारांसाठी परदेशात हलविले जाण्याची शक्यता आहे.

Story img Loader