मांस खाणारे पुरूष ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे महिलांनी मांस खाणाऱ्या पुरुषांबरोबर लैंगिक संबंध ठेऊ नये, असे आवाहन ‘पेटा’ या संस्थेने केले आहे. या आवाहनानंतर जर्मनीत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा – Sex Helps In Anti Aging: ‘सेक्स’मुळे मी आजही तरुण; अनिल कपूर यांच्या ‘त्या’ विधानावर डॉक्टरांचं मत जाणून घ्या
‘पेटा’च्या जर्मनी येथील शाखेने गेल्या वर्षी ‘प्लॉस वन’ या जर्नलमध्ये प्रकाशित एका संशोधानचा आधार घेत म्हटले आहे की, “पुरुष महिलांच्या तुलनेत जास्त मांस खातात. पुरुष हे महिलांपेक्षा ४१ टक्के जास्त प्रदूषण करतात. त्यामुळे मुले होण्यावर बंदी घालणे आवश्यक आहे. एका मुलामागे ५८.०६ टन कार्बन उत्सर्जन आपण वाचवू शकतो.” तसेच तापमान वाढीपासून पृथ्वीला वाचवण्यासाठी मांसावर ४१ टक्के कर लावावा, असेही आवाहनही ‘पेटा’तर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा – Sex After Heart Attack: हृदयाचे आजार असल्यास शारीरिक संबंध ठेवणे… तज्ज्ञांनी केला महत्त्वाचा खुलासा
जर्मनीतील काही राजकारण्यांकडून ‘पेटा’च्या या आवाहनाला विरोध करण्यात आला आहे. ‘सेक्स स्ट्राइक’ प्रकार मुर्खपणा असून मांस खाणार्यांविरोधात सेक्स स्ट्राइक केल्यापेक्षा दोघांमध्ये फूट पाडणार्या विचारसरणीवर बंदी घातली पाहिजे, असे फ्लोरियन हॅन यांनी म्हटले आहे. तर जर्मनीतल्या मास विक्रेत्यांनीही हा प्रकार चुकीचा असल्याचे म्हटले आहे. ३६ वर्षीय जेसिका स्टॅहल या जर्मनीत मास विक्रेत्या आहेत. त्या म्हणाल्या, “या निर्णयानंतर मला धक्का बसला आहे. माझे मांस विक्रीचे दुकान आहे. माझ्या दुकानात पुरुषांपेक्षा महिला जास्त येतात. महत्त्वाचे म्हणजे मी जर माझ्या पतीला लैंगिक संबंध ठेवण्यास मनाई केली तर मला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.”
हेही वाचा – लैंगिक समस्या-प्रश्नोत्तरे : छोटे स्तन माझ्या वैवाहिक संबंधांवर परिणाम करतील का?
‘सेक्स स्ट्राईक’ ही संकल्पना काय?
‘सेक्स स्ट्राईक’ ही संकल्पना प्राचीन ग्रीक काळातली आहे. अॅरिस्टोफेन्सच्या लिसिस्ट्राटा नाटकात स्त्रिया त्यांच्या जोडीदारांबरोबर लैंगिक संबंध नाकारून पेलोपोनेशियन युद्ध करण्यासाठी जातात, असं दाखवलं आहे. तर २०१९ मध्ये जॉर्जियामध्ये नवीन गर्भपात कायद्याच्या निषेधार्थ महिलांना ‘सेक्स स्ट्राईक’ करण्याचे आवाहन करण्यात आले होते.