शीना बोरा हत्या प्रकरणी पीटर मुखर्जी याची सत्यशोधन चाचणी (पॉलिग्राफ टेस्ट) करण्यात आली. शीना बोरा या सावत्र मुलीच्या तीन वर्षांपूर्वीच्या हत्या प्रकरणात त्यांचा हात होता, असा आरोप असून शीनाचा खून आर्थिक कारणातून झाल्याची शक्यता आहे
सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभाग) सूत्रांनी सांगितले की, मुखर्जी यांचे पत्नी इंद्राणी यांच्याशी झालेले संवाद आणि गुन्ह्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी परस्परविरोधी उत्तरे दिली. त्यामुळे शहानिशा करण्यासाठी पीटर मुखर्जीची सत्यशोधन चाचणी करण्याची वेळ आली.
सीबीआयच्या केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेत त्यांची चाचणी करण्यात आली. त्यांनी सांगितले की, काही प्रश्न असे होते ज्यात मुखर्जी यांनी फसवी उत्तरे दिली. सीबीआयला विशेष न्यायालयाने पीटर यांची पॉलिग्राफ म्हणजेच सत्यशोधन चाचणी करण्याची परवानगी दिली होती.
सीबीआयने पीटर मुखजीला मुंबईत सोमवारी विशेष न्यायालयात उभे केले तेव्हा त्यांना कोठडी देण्यात आली. सीबीआयने मुखर्जी यांचे १९ नोव्हेंबरला जबाब नोंदवण्यात आले होते. इंद्राणी व मुखर्जी यांनी शीना बोराच्या परदेशातील खात्यात बरेच पैसे ठेवले होते. त्या दोघांनी प्रसारमाध्यम कंपनी स्थापन केली होती. शीना व राहुल यांच्यातील संवादाच्या तपशिलातील काही बाबी स्पष्ट होत नव्हत्या. सूत्रांनी असे सांगितले की, पीटर मुखर्जी यांनी दिलेली काही उत्तरे फसवी होती त्यामुळे पॉलिग्राफ चाचणी करावी लागली.
पीटर मुखर्जी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा