पीटीआय, नवी दिल्ली

देवतांच्या नावावर मते मागितल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहा वर्षे निवडणुका लढविण्यास अपात्र करावे, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. न्या. सचिन दत्ता यांनी सांगितले की, ही याचिका निराधार असून चुकीची आहे. याचिकाकर्त्याचे अनेक गैरसमज झाल्याचे याचिकेद्वारे दिसून येते. दिल्लीतील वकील आनंद जोंधळे यांनी देवता आणि प्रार्थनास्थळांच्या नावावर मते मागितल्याबद्दल मोदींविरुद्ध कारवाई करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. यापूर्वी त्यांनी निवडणूक आयोगाकडेही याबाबत तक्रार केली होती.

emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
high court
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, न्यायिक अधिकाऱ्यांच्या नावेही पैशांची मागणी; उच्च न्यायालय प्रशासनाकडून प्रकाराची गंभीर दखल
Amit Shah Mumbai, Amit shah news,
Amit Shah Mumbai : महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको! अमित शहा यांची सूचना; पक्षाच्या निवडणूक तयारीचा आढावा
cbi anil Deshmukh marathi news
सीबीआयकडून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलीस उपायुक्त, निवृत्त सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा
badlapur rape case marathi news
बदलापूर प्रकरणात माध्यम प्रतिनिधींचा आरोपींमध्ये समावेश; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नोटीसा आल्याने संताप
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
ajit pawar visit at rajkot fort malvan
Ajit Pawar : “शिवरायांच्या नावाला साजेसं स्मारक उभारणार”; राजकोट किल्ल्याच्या पाहणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; ठाकरे-राणे वादावर म्हणाले…

याचिकेत म्हटले आहे की पंतप्रधानांनी ९ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील पिलिभीत येथे भाषण केले होते, जेथे त्यांनी ‘‘हिंदू आणि शीख देवतांच्या आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांच्या नावाने केवळ मतेच मागितली नाहीत तर विरोधी राजकीय पक्षांविरुद्ध मुस्लिमांची बाजू घेत असल्याची टिप्पणीदेखील केली होती.’’याचिकाकर्त्याने आरोप केला आहे की, त्यांच्या भाषणादरम्यान पंतप्रधानांनी मतदारांना ‘‘हिंदू देवता आणि हिंदू पूजास्थान तसेच शीख देवता आणि शीख प्रार्थनास्थळ’’ या नावाने भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांना धार्मिक देवता आणि प्रार्थनास्थळांच्या नावावर मते मागण्यापासून रोखावे असे याचिकेत म्हटले होते.