पीटीआय, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी (४ जून) भांडवली बाजार कोसळून गुंतणवूकदारांचे अब्जावधींचे नुकसान झाले. याचा तपशीलवार अहवाल सादर करण्यासाठी केंद्र आणि भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळाला (सेबी) निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

Mumbai ED filed supplementary charge sheet against OctaFX and other related entities
ऑक्टाएफएक्स प्रकरण : ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल, देशातील व्यवहारांतून ८०० कोटी जमा केल्याचा आरोप
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
nda government set up a national commission to review the performance of constitution zws
संविधानभान : संविधानाच्या कामगिरीचा आढावा 
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
High Court rejects plea for abortion in 31st week
एकतिसाव्या आठवड्यात गर्भापाताची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली
share market Major indices, share market ,
स्फुरणाअभावी निर्देशांकांना सुस्ती
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!

अदानी-हिंडनबर्ग प्रकरणी दाखल जनहित याचिकेवरील सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने न्या. ए एम सप्रे यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांची समिती गठीत केली होती. समितीच्या अहवालातील सूचनांचा विचार केला जावा, या सर्वोच्च न्यायालयाने ३ जानेवारीला दिलेल्या आदेशावर स्थिती अहवाल सादर करण्यासाठी सरकार आणि सेबीला निर्देश दिले जावेत, अशीही मागणी अॅड. विशाल तिवारी यांनी दाखल केलेल्या या याचिकेत केली आहे.

हेही वाचा >>>नव्या रालोआपर्वाची सुरुवात; राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात भव्य शपथविधी सोहळा

सर्वोच्च न्यायालयाने ३ जानेवारीच्या आदेशात सांगितले होते की, केंद्र सरकार आणि सेबीने तज्ज्ञांच्या समितीच्या सूचनांचा रचनात्मक विचार करावा आणि नियमन चौकट अधिक मजबूत करण्यासाठी, गुंतवणूकदारांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी आणि सिक्युरिटीज मार्केटचे योग्य कामकाज सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.

मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपला दणदणीत यश मिळेल, असा अंदाज व्यक्त केल्यानंतर सोमवारी मुंबई शेअर बाजार निर्देशांक ७६,४६९ पर्यंत पोहोचला. निकालानंतर ते ४,३९० अंकांनी कोसळला. त्यामुळे गुंतवणूकदारांचे अब्जावधींचे नुकसान झाले. याच्या चौकशीची मागणी अॅड. तिवारी यांनी केली आहे.

Story img Loader