आयएसआय या गुप्तचर यंत्रणेकडून १९९०च्या दशकात बेकायदेशीरपणे निधी स्वीकारल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना अपात्र घोषित करावे या मागणीसाठी करण्यात आलेली याचिका येथील न्यायालयाने शनिवारी फेटाळून लावली.
मेहरन बँक घोटाळ्यात शरीफ यांचा हात असून माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुत्तो यांचे सरकार उलथून टाकण्यासाठी त्यांनी आयएसआय या गुप्तचर यंत्रणेकडून ३.३ दशलक्ष रुपये स्वीकारले, असा आरोप अर्जदाराने आपल्या याचिकेत केला होता.
मेहरन बँक घोटाळ्यात अनेक राजकीय नेत्यांचा हात असून त्यामध्ये शरीफ यांचाही समावेश आहे. त्यामुळे शरीफ यांना अपात्र घोषित करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा