वृत्तसंस्था, बँगकॉक

दुही माजवणारे नेते अशी ओळख असलेले माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांची कन्या पेतोंगतार्न शिनावात्रा यांची थायलंडच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर थायलंडच्या पंतप्रधानपदावरून स्रोथा थविसिन यांना हटवण्यात आले. तेथील संसदेने पेतोंगतार्न यांची पंतप्रधानपदासाठी निवड जाहीर केली. रविवारी शाही पत्र देऊन त्यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे.

AAP leader and Delhi minister Kailash Gehlot resigned from party
Kailash Gehlot resigns: विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा झटका; कॅबिनेट मंत्री कैलाश गेहलोत यांनी आरोपांची राळ उठवत दिला राजीनामा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nitin Gadkari, Chinchwad Constituency, Shankar Jagtap,
पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एलिव्हेटेड रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – नितीन गडकरी
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
Dhananjay Munde
Dhananjay Munde : “पंकजाताईने मन मोठं केलं म्हणून…”, धनंजय मुंडेंचं परळीकरांसमोर वक्तव्य; म्हणाले, “मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी…”
nirmala sitharaman to meet states finance ministers for budget preparation
निर्मला सीतारामन अर्थसंकल्पाच्या तयारीला, राज्यांच्या अर्थमंत्र्यांची भेट घेणार! जीएसटी परिषदेच्या बैठकीपूर्वी मसलतही विषयपत्रिकेवर
Mohammad Rizwan Says I am only a captain for toss and presentation
Mohammad Rizwan : ‘मी फक्त टॉस आणि प्रेझेंटेशनसाठी कर्णधार…’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद रिझवानचे मोठे वक्तव्य

पेतोंगतार्न या त्यांच्या मावशीनंतर थायलंडच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत. शिवाय त्या देशातील सर्वांत तरुण पंतप्रधानही ठरल्या आहेत. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर ३७ वर्षीय पेतोंगतार्न यांनी थाई नागरिक आणि खासदारांचे आभार मानले. आपली कर्तव्ये खुल्या मनाने पार पाडेल आणि थाई लोकांना स्वप्न पाहण्याची, ती घडवण्याची आणि स्वत:चे भविष्य ठरवण्याचे धाडस करण्यास प्रोत्साहन दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

हेही वाचा >>>भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे निधन

अब्जाधीश असलेले वडील थाकसिन शिनावात्रा आणि मावशी यिंगलक शिनावात्रा यांच्यानंतर पंतप्रधानपद सांभाळणारी पेतोंगतार्न ही शिनावात्रा कुटुंबातील तिसरी व्यक्ती ठरली आहे. वडील आणि मावशी या दोघांनाही पदावरून काढून टाकण्यात आले होते. बँकॉकमधील सत्ताधारी मूव्ह फॉरवर्ड पक्षाच्या मुख्यालयामध्ये आयोजित एका समारंभात पेतोंगतार्न यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी सत्ताधारी आघाडीतील पक्षांचे वरिष्ठ सदस्य उपस्थित होते. तत्पूर्वी वडील थाकसिन आणि मुलगी पेतोंगतार्न एकाच वाहनातून मुख्यालताय दाखल झाले. या वेळी त्यांनी हात उचांवून सर्वांना अभिवादन केले.