मागच्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत असून पुढच्या काही दिवसात या किंमती आणखी भडकू शकतात. ब्रोकरेज कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक निवडणुकीच्या आधी तेल कंपन्यांना पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतून जे मार्जिन मिळायचे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी  प्रतिलिटर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये चार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कर्नाटक विधानसभा निवडणूक संपल्यानंतर सोमवारपासून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, एचपीसीएल, बीपीसीएल या सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी-जास्त करण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटक निवडणूक संपल्यानंतर आतापर्यंत प्रति लीटर पेट्रोल ६९ पैशांनी महागले असून यामध्ये आज झालेल्या २२ पैशांच्या वाढीचाही समावेश आहे. या आठवडयात डिझेलच्या किंमतीमध्ये ८६ पैसे वाढ झाली असून आज २२ पैशांची वाढ झाली.

गुरूवारी पेट्रोलच्या किंमतीत २२ ते २३ पैशांनी वाढ झाली आहे. तर, डिझेलच्या किंमती २२ ते २४ पैशांनी वाढल्या. इंडियन ऑइल कंपनीच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी मुंबईत पेट्रोलचे दर ८३.१६ रुपये प्रतिलिटर झाले, तर डिझेलचे प्रतिलिटर दर ७१.१२ रुपये झाले आहे. दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी ७५.३२ रुपये मोजावे लागत आहेत. जवळपास ५६ महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमती ७६.३२ रुपयांना पोहोचल्या होत्या. एक लिटर डिझेलसाठी दिल्लीमध्ये ६६.७९ रुपये मोजावे लागत आहेत. डिझेलच्या दरांनी दिल्लीमध्ये गाठलेला हा उच्चांक असल्याचं बोललं जात आहे.

१२ मे रोजी कर्नाटकमध्ये मतदान झाल्यानंतर लगेचच इंधन दरवाढ सुरू करण्यात आली आहे. कर्नाटकमधील निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतील अशी शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात येत होती. गेल्या वर्षी गुजरात निवडणुकांनंतरही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सारख्या कंपन्यांनी तेथे जवळपास १५ दिवस सातत्याने एक ते तीन पैशांची कपात केली होती. मात्र, मतदानानंतर तेथेही दरवाढ झाली होती.