आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा तेलाच्या किमतीत घसरण झाल्याने देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रुपयांची घट होणार असून नवे दर सोमवार मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या प्रतिबॅरेल दरात तीन डॉलर्सने घसरण झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. राज्याराज्यांमधील विक्रीकर तथा मूल्यवर्धित करात फरक असल्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या प्रति लिटर दरामागे काही बदल होतील. त्यानुसार दिल्लीत पेट्रोलच्या प्रति लिटरसाठी आता ६१.३३ रु. तर डिझेलला प्रति लिटरमागे ५०.५१ रु. मोजावे लागतील. मुंबईत ग्राहकांना पेट्रोलच्या प्रतिलीटरमागे ६८.८६ रु. आणि डिझेलसाठी प्रतिलीटर ५७.९१  रु. द्यावे लागतील. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाचा प्रतिबॅरेल दर ६५ डॉलर इतका होता त्यात आता घट होऊन प्रतिबॅरेल ६२ डॉलर इतका झाला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत.

Story img Loader